खड्ड्याने आईचा जीव घेतला, मुलाची रस्त्यावर उतरुन गांधीगिरी

| Updated on: Nov 09, 2021 | 9:09 AM

आपल्या आईचा अपघातात जीव गेला पण असा अपघात होऊन कुणाच्या जीवाचा अंत होऊ नये म्हणून यवतमाळच्या एका व्यक्तीने गांधीगिरी करत रस्त्यावर पांढरे पट्टे आखले आखले. पण शेवटी दगडाच्या काळजाचं शासन प्रशासनच ते... एवढं होऊनही रस्त्याची दुरुस्ती करणं किंवा डागडुजी करण्याचं पाऊल शासन प्रशासनाने उचललं नाही.  

खड्ड्याने आईचा जीव घेतला, मुलाची रस्त्यावर उतरुन गांधीगिरी
खड्ड्याने आईचा जीव घेतला, मुलाची रस्त्यावर उतरुन गांधीगिरी
Follow us on

यवतमाळ : आपल्या आईचा अपघातात जीव गेला पण असा अपघात होऊन कुणाच्या जीवाचा अंत होऊ नये म्हणून यवतमाळच्या एका व्यक्तीने गांधीगिरी करत रस्त्यावर पांढरे पट्टे आखले आखले. पण शेवटी दगडाच्या काळजाचं शासन प्रशासनच ते… एवढं होऊनही रस्त्याची दुरुस्ती करणं किंवा डागडुजी करण्याचं पाऊल शासन प्रशासनाने उचललं नाही.

खड्ड्याने आईचा जीव घेतला

दारव्हा येथील युवराज दुधे यांची आई त्यांच्या भावासोबत 24 मे 2021 रोजी दुचाकीवरून यवतमाळला येत असताना लाडखेड गावाजवळ असलेल्या खड्ड्यातून दुचाकी उसळून शोभा दुधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब कसेबसे आता सावरत आहे.

मुलाची रस्त्यावर उतरुन गांधीगिरी

काल परवा याच मार्गावरुन युवराज दुधे जात असताना त्यांच्या आईचा अपघात झाला त्याच ठिकाणी आणखी एका व्यक्तीचा अपघात झाला. ते चित्र पाहून युवराज यांनी दुसऱ्या कुणाचा अपघात होवू नये म्हणून दारव्हा यवतमाळ महामार्गावरपांढरे पट्टे आखले. खड्डे बुजविले नाही म्हणून गांधीगिरी करीत रस्त्यावरच्या खड्ड्यांभोवती त्यांनी गोल काढले.

मंजूर कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ, शेतकऱ्याचा बँकेच्या समोरच गळफास

मंजूर कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्याने बँकेच्या समोरच गळफास घेत आत्महत्या केलीय. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नायगांव शहरातील शाखेत हा प्रकार घडलाय.

मयत आनंदा रोडे यांना अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले होते. कर्ज मंजूर होऊन दोन वर्षे झाली तरी बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने निराश झालेल्या आनंदा रोडे यांनी बँकेसमोरच गळफास घेत जीवन संपवलंय.

हे ही वाचा :

गाडीचा धक्का लागल्यावरुन वाद, उल्हासनगरात अल्पवयीन मुलाला तिघांनी भोसकलं

ईडीच्या कचाट्यातून सुटताच सीबीआय अनिल देशमुखांचा ताबा घेणार, कॅश फॉर ट्रान्स्फर प्रकरण भोवणार?