AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीच्या कचाट्यातून सुटताच सीबीआय अनिल देशमुखांचा ताबा घेणार, कॅश फॉर ट्रान्स्फर प्रकरण भोवणार?

1 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख कालपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. त्यांची ईडी कोठडी शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी संपली. त्यामुळे ईडीने त्यांना सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 13 दिवसांची वाढ केली.

ईडीच्या कचाट्यातून सुटताच सीबीआय अनिल देशमुखांचा ताबा घेणार, कॅश फॉर ट्रान्स्फर प्रकरण भोवणार?
ईडीच्या कचाट्यातून सुटताच सीबीआय अनिल देशमुखांचा ताबा घेणार, कॕश फॉर ट्रान्स्फर प्रकरण भोवणार?
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 10:08 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय-ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे. आता केंद्रीय अन्वेषण विभागही देशमुख यांच्या कोठडीची (सीबीआय कस्टडी) मागणी करू शकते. ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ प्रकरणात अनिल देशमुख यांच्या कथित भूमिकेबद्दल सीबीआयला चौकशी करायची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. रोख रकमेच्या बदल्यात महाराष्ट्रातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या अनुकूल पदांवर बदल्या झाल्याचा आरोप आहे. बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्यासंबंधित एजन्सीच्या तपासादरम्यान नाव समोर आल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी, संतोष शंकर जगताप या कथित मध्यस्थाला सीबीआयने अटक केली होती. काही पोलिस आणि राजकारणी त्याच्या जवळचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

देशमुख 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती देण्यात आली आहे की, या प्रकरणात आता सीबीई देखील अनिल देशमुख यांच्या जामिनाची मागणी करू शकते. अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी संपल्यानंतर सीबीआय न्यायालयाकडून माजी गृहमंत्र्यांची कोठडी मागणार आहे. देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने देशमुख यांच्या कोठडीची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुखला 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

अनिल देशमुखांना 1 नोव्हेंबर रोजी ईडीकडून अटक

1 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली होती. देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख कालपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. त्यांची ईडी कोठडी शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी संपली. त्यामुळे ईडीने त्यांना सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 13 दिवसांची वाढ केली. मात्र न्यायालयाने त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत न ठेवता न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याविरोधात ईडीने आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अनिल देशमुख यांच्या कोठडीची ईडीने मागणी केली. ईडीची मागणी मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

अनिल देशमुखांच्या मुलालाही समन्स

अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी 5 नोव्हेंबरला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावला आहे. दरम्यान ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाकडूनही ऋषिकेश देशमुखांना दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. (CBI to take immediate action against Anil Deshmukh after ED remand in money laundering case)

इतर बातम्या

VIDEO | अँटेलियाची सुरक्षा वाढवली, टॅक्सीवाल्याला लोकेशन विचारणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु

VIDEO: राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.