AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | अँटेलियाची सुरक्षा वाढवली, टॅक्सीवाल्याला लोकेशन विचारणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती देणार्‍या टॅक्सी चालकाने सांगितले की, ते दोघे जण आहेत. त्यांच्यामध्ये एक दाढी असलेला माणूस होता. त्याने किल्ला कोर्टजवळ अँटिलियाचे लोकेशन विचारले. दोघांकडे बॅगही होती. या माहितीनंतर पोलीस त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

VIDEO | अँटेलियाची सुरक्षा वाढवली, टॅक्सीवाल्याला लोकेशन विचारणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु
अँटेलियाची सुरक्षा वाढवली
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 8:07 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटेलियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलीस कक्षाला एका टॅक्सीचालकाने फोन केला होता. यावेळी त्याच्या टॅक्सीत बसलेले दोन लोक अँटेलियाचे लोकेशन विचारत होते असे त्या टॅक्सी चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी अँटेलियाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॅरिकेडिंग लावून तपासणी केली जात आहे. तसेच ही माहिती देणाऱ्या टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवत असून त्याच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅक्सी चालकाने काय माहिती दिली

टॅक्सीत बसलेल्या त्या दोन व्यक्तींकडे बॅग असल्याचेही टॅक्सी चालकाने सांगितले. पोलिस आता दोन संशयितांचा शोध घेत आहेत, जे टॅक्सी चालकाची अँटिलियाबद्दल चौकशी करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती देणार्‍या टॅक्सी चालकाने सांगितले की, ते दोघे जण आहेत. त्यांच्यामध्ये एक दाढी असलेला माणूस होता. त्याने किल्ला कोर्टजवळ अँटिलियाचे लोकेशन विचारले. दोघांकडे बॅगही होती. या माहितीनंतर पोलीस त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. महानगरात नाकाबंदी करून तपास सुरू आहे. खुद्द मुंबई पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत.

25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे मुंबईतील 27 मजली अँटिलियामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. यावर्षी 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियाच्या बाहेर जिलेटिनच्या काठ्यांनी भरलेली कार सापडली होती. त्या वाहनात एक धमकीची चिठ्ठीही सापडली होती, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडाली होती. तपासात हे वाहन मनसुख हिरेन नावाच्या व्यावसायिकाचे असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांनी आठवडाभरापूर्वीच कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आठवडाभरानंतर मनसुख हिरेंचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या संपूर्ण प्रकरणाचा कट रचल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे एपीआय सचिन वाजे याला अटक करण्यात आली. जो अजूनही तुरुंगात आहे. त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अशा स्थितीत त्यांच्या घराजवळ पुन्हा एकदा संशयित लोक आढळून येणे ही गंभीर बाब आहे. सध्या एनआयए अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. पुन्हा एकदा एका टॅक्सी चालकाने मुकेश अंबानींच्या घराच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर मुंबई पोलिस तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुकेश अंबानींच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. (Police have stepped up security in Antelia for security reasons)

इतर बातम्या

VIDEO: राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता

ज्ञानदेव वानखेडेंच्या आरोपांवर उद्याच म्हणणं सादर करा; कोर्टाचे नवाब मलिकांना आदेश

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.