Parbhani | जिंतूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, नदी, नाल्यांना पूर, असंख्य घरात शिरले पाणी!

| Updated on: Jun 25, 2022 | 10:41 AM

ढगफुटीसदृस्य पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकताच पेरणी केली होती, पावसामुळे सर्व पिक वाहून गेले. काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी केलेल्या पेरण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Parbhani | जिंतूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, नदी, नाल्यांना पूर, असंख्य घरात शिरले पाणी!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्हामध्ये सातत्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. जिंतूर (Jintur) तालुक्यातील वडी परिसरात शुक्रवारी ढगफुटीसदृस्य पाऊस झाला. या पावसामुळे असंख्य घरात पाणी शिरले. आमदार मेघना बोर्डीकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना दिलासा देत संपूर्ण वडी गावची पाहणी (Survey) करून अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. वडी, घागरा, बेलोरा आदी भागामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यानंतर नदी, नाल्यांना पूर येत थेट लोकांच्या घरामध्येच पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान (Damage) झाले असून अनेक घरांची पडझड देखील झाली.

ढगफुटीसदृस्य पावसामुळे घरांचे मोठे नुकसान

ढगफुटीसदृस्य पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकताच पेरणी केली होती, पावसामुळे सर्व पिक वाहून गेले. काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी केलेल्या पेरण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, काही भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

अधिकाऱ्यांनी केली पाहणी

वडी परिसरात शुक्रवारी झालेल्या ढगफुटीसदृस्य पावसानंतर नायब तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, सरपंच माधव पवार, सुदामराव गायकवाड, कैलास खंदारे यांनी पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांनी नुकसानीचा पंचनामा करावा, तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली. ढगफुटीसदृस्य पावसामध्ये शेताचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले. परभणी शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता परत एकदा दमदार पाऊस होतो आहे. यामुळे पाणीटंचाईपासून नागरिकांची सुटका झाली.