Eknath Shinde : गटनेता, प्रतोदनंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती, एकनाथ शिंदे गटाची तयारी जोरात, कोण होणार प्रवक्ता?

शिवसेनेनं बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला असून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तर शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी दोन खासदार वगळता इतर सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याचा दावा केलाय.

Eknath Shinde : गटनेता, प्रतोदनंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती, एकनाथ शिंदे गटाची तयारी जोरात, कोण होणार प्रवक्ता?
एकनाथ शिंदेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 4:08 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून गटनेता, प्रतोद यानंतर आता प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसतंय. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटाकडून संख्याबळावर वेगवेगळे दावा केले जातायत. शिवसेनेनं आपल्याकडे 21 आमदार (MLA) असल्याचा दावा यापूर्वी केला होता. तर शिंदे यांच्यासोबत जवळपास 47 आमदार आहेत, असा दावा केला जातोय.  यामुळे नेमके कुणासोबत किती आमदार, हा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. तर शिवसेनेनं बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला असून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. तर शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी दोन खासदार वगळता इतर सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याचा दावा केलाय. या सगळ्यात शिंदे गट आणखी सक्रिय झाला असून त्यांच्याकडून आता नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहेत.

कुणाची होणार प्रवक्तेपदी नियुक्ती?

शिंदे गटाकडून कुणाची प्रवक्तेपदी नियुक्ती केली जाणार, हे आता चर्चेत आहे. त्यामुळे अनेक नावं दिखील पुढे येत असून अद्याप त्यावर शिकामोर्तब झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाकडे किती आमदार?

  1. एकनाथ शिंदे
  2. अनिल बाबर
  3. शंभूराजे देसाई
  4. महेश शिंदे
  5. शहाजी पाटील
  6. महेंद्र थोरवे
  7. भरतशेठ गोगावले
  8. महेंद्र दळवी
  9. प्रकाश अबिटकर
  10. डॉ. बालाजी किणीकर
  11. ज्ञानराज चौगुले
  12. प्रा. रमेश बोरनारे
  13. तानाजी सावंत
  14. संदीपान भुमरे
  15. अब्दुल सत्तार नबी
  16. प्रकाश सुर्वे
  17. बालाजी कल्याणकर
  18. संजय शिरसाठ
  19. प्रदीप जयस्वाल
  20. संजय रायमुलकर
  21. संजय गायकवाड
  22. विश्वनाथ भोईर
  23. शांताराम मोरे
  24. श्रीनिवास वनगा
  25. किशोरअप्पा पाटील
  26. सुहास कांदे
  27. चिमणआबा पाटील
  28. लता सोनावणे
  29. प्रताप सरनाईक
  30.  यामिनी जाधव
  31. योगेश कदम
  32. गुलाबराव पाटील
  33. मंगेश कुडाळकर
  34. सदा सरवणकर
  35. दीपक केसरकर
  36. दादा भुसे
  37. संजय राठोड

पुन्हा एकदा संख्याबळावर चर्चा

खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

आकडे आणि दावे

  1. शिंदे यांच्यासोबत जवळपास 47 आमदार आहेत, असा दावा केला जातोय
  2. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी
  3. उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 आमदार असल्याचा दावा
  4. भावना गवळी, श्रीकांत शिंदे हे दोन्ही शिंदे गटासोबत, किर्तीकर यांचा दावा
  5. शिवसेनेकडून बहूमत सिद्ध करण्याचा दावा
  6. त्यामुळे नेमके कुणाकडे किती आमदार, हे सिद्ध होत नाही
  7. शिवसेना आणि शिंदे गटाकडून आमदारांच्या संख्येत नेहमी बदल होतोय
  8. दोन तृतीयांश संख्या शिंदे गटाकडे असल्याचा दावा देखील त्यांनी यापूर्वी केलाय
  9. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचा इशारा दिलाय
  10. गुवाहाटी ते मुंबई अशी चाललेली रेस कधी संपणार याची उत्सुकता आहे
  11. भाजपकडून सरकार स्थापनेची ऑफर आल्याचा दावाही करण्यात येतोय.
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.