AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स, रील्सना लाखो, कोटींनी व्ह्यूज; अचानक मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्रामने अकाऊंट केलं बंद

मराठी अभिनेता विवेक सांगळे याचं इन्स्टाग्राम अकाऊंट दोन महिन्यांपूर्वी मेटाकडूनच डिलिट करण्यात आलं होतं. अनेक प्रयत्न करूनही त्याला ते अकाऊंट परत मिळवता येत नाहीये. त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं आहे.

1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स, रील्सना लाखो, कोटींनी व्ह्यूज; अचानक मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्रामने अकाऊंट केलं बंद
Vivek Sangle Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 10, 2026 | 12:42 PM
Share

‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘भाग्य दिले तू मला’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता विवेक सांगळे याला इन्स्टाग्रामने मोठा धक्का दिला आहे. त्याचं व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद झालं असून गेल्या दोन महिन्यांपासून तो अकाऊंट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने प्लॅटफॉर्मने सांगितलेली नियमित अपील प्रक्रियासुद्धा पूर्ण केली आहे. तरीही या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर त्याने शून्यातून नवी सुरुवात करण्याचं ठरवलं आहे. विवेकने इन्स्टाग्रामवर नवीन अकाऊंट सुरू केलं असून त्यावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे.

काय म्हणाला विवेक?

“गेल्या दोन महिन्यांपासून मला माझ्या खूप साऱ्या मित्रांचे मेसेज आणि फोन येत आहेत. इन्स्टाग्रामवरून तू अचानक गायब का झालास, असं ते मला विचारत आहेत. तुझं अकाऊंट दिसत नाहीये, सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतलास की काय, असा सवाल ते करत आहेत. आज मला तुम्हा सर्वांनाच सांगायचं आहे की, 3 जानेवारी 2026 रोजी इन्स्टाग्रामने मला कोणतीही पूर्वसूचना किंवा पूर्वकल्पना न देता माझं अकाऊंट डिलिट केलं आहे. ते अकाऊंट परत मिळवण्यासाठी मी या दोन महिन्यांत खूप प्रयत्न केले आहेत. मी बीकेसीच्या मेटाच्या टीमसोबत बोललोय, इन्स्टाग्रामच्या कस्टमर केअरसोबत मी फोनवर बोललोय, मेटाच्या युएसमधील टीमला खूप सारे मेल्स केले आहेत. दु:ख या गोष्टीचं वाटतं की त्यांनी माझ्या एकाही मेलला रिप्लाय केला नाही. इतक्या वर्षांच्या मेहनतीवर एका दिवसांत पाणी फेरलं गेलंय. मला खूप वाईट वाटलं आणि गेल्या दोन महिन्यांपासून मी बरेच प्रयत्न केले आहेत. अखेर आता पुन्हा मी एक नवी सुरुवात करतोय,” असं म्हणत त्याने इन्स्टाग्रामच्या नव्या अकाऊंटची माहिती दिली.

अकाउंट बंद होण्यापूर्वी विवेकच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्याच्या अनेक रील्सना लाखो आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळाले होते. त्यापैकी एका व्हिडिओला 32 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. आजच्या काळात कलाकारांसाठी इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ चाहत्यांशी संवादाचं माध्यम नसून प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख यासाठीही महत्त्वाचं साधन बनलं आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर तसंच व्यावसायिक संधींवरही परिणाम होऊ शकतो.

Follow Us
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी.
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग.
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.