Dapoli Crime : दापोलीत तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात याचा शोध सुरु

मयत महिलांपैकी सत्यवती पाटणे आणि पार्वती पाटणे या दोघीच घरी राहत होत्या. तर इंदुबाई पाटणे या त्यांच्या नातेवाईक असून त्या समोरच्या घरामध्ये राहत होत्या. या महिलांचे नातेवाईक कामानिमित्त मुंबईत राहतात.

Dapoli Crime : दापोलीत तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात याचा शोध सुरु
प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या

रत्नागिरी : दापोली शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे तीनही महिला जळून मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून हा अपघात आहे की घातपात याचा पोलीस शोध घेत आहेत.

वेगवेगळ्या खोलीत आढळले मृतदेह

सत्यवती पाटणे (75), पार्वती पाटणे (90) व इंदुबाई पाटणे (85) अशी जळून मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. मयत महिलांपैकी सत्यवती पाटणे आणि पार्वती पाटणे या दोघीच घरी राहत होत्या. तर इंदुबाई पाटणे या त्यांच्या नातेवाईक असून त्या समोरच्या घरामध्ये राहत होत्या. या महिलांचे नातेवाईक कामानिमित्त मुंबईत राहतात. या तीनही महिला एकमेकींचा आधार होत्या. सत्यवती पाटणे या चुलीजवळ, पार्वती पाटणे या दुसऱ्या खोलीत तर इंदुबाई पाटणे या हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या.

कुलदैवतेच्या मंदिरात पूजेसाठी आलेल्या गावकऱ्यामुळे घटना उघडकीस

पाटणे यांच्या घरासमोरच कुलदेवतेचे मंदिर आहे. या मंदिरात दररोरज पूजा करण्याकरीता गावातील विनायक पाटणे येतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने या महिला रोज सकाळी उन्हात बसायच्या. मात्र नेहमीप्रमाणे विनायक पाटणे कुलदैवताची पूजा करण्यासाठी आले तेव्हा या महिला बाहेर दिसल्या नाहीत. तसेच घराचे दारही आतून बंद होते. विनायक यांनी दरवाजा ठोठावला असता आतून काही प्रतिक्रिया आली नाही. त्यांनी मागच्या दरवाज्याकडे जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा उघडा होता. आत जाऊन पाहिले असता या तिघी महिला मृतावस्थेत आढळल्या. यानंतर पाटणे यांनी तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

श्वान पथकाद्वारे अधिक तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला कसून तपास करीत आहेत. श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पोलीस सखोल तपास करीत आहेत. या महिलांचा अचानक अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं या प्रकरणामध्ये घातपाताचा संशय आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान गावातील बहुसंख्य लोक हे कामानिमित्त शहरामध्ये राहतात. यामुळे गावातील बहुतेक घरं बंद आहेत. या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Suspicious death of three elderly women in Dapoli, Police are investigating the incident)

इतर बातम्या

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी होणार

Solapur Crime: उजनी धरणात होडीतून फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पाहुण्यासह मच्छिमाराचा बुडून मृत्यू

Published On - 11:52 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI