AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani Crime : परभणीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

अर्जुन आणि प्रियंका यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. अर्जुन सेलू शहरात ऑटोरिक्षा चालवून उपजीविका करत असे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र सकाळी उशिर झाला तरी उठले नसल्याने अर्जुनची बहिण प्रियंकाने दरवाजा ठोठावला. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

Parbhani Crime : परभणीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Reporter Najir Khan
Reporter Najir Khan | Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 28, 2022 | 3:36 PM
Share

परभणी : अज्ञात कारणातून पती-पत्नी (Husband-Wife)ने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना परभणीतील सेलू शहरात राजीव गांधी नगरमध्ये उघडकीस आली आहे. अर्जुन गणेश आवटे (32) आणि प्रियंका अर्जुन आवटे (28) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. अर्जुनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची सत्यता तपासण्यात येणार आहे. मात्र घटनेमुळे सेलू शहरात विविध चर्चांना उधाण आला आहे. (The bodies of husband and wife were found in Parbhani)

तीन वर्षापूर्वीच झाला होता विवाह

अर्जुन आणि प्रियंका यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. अर्जुन सेलू शहरात ऑटोरिक्षा चालवून उपजीविका करत असे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघे पती-पत्नी आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र सकाळी उशिर झाला तरी उठले नसल्याने अर्जुनची बहिण प्रियंकाने दरवाजा ठोठावला. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे प्रियंकाने वडिलांनी याची माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता दोघे मृतावस्थेत आढळले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करत तपास सुरू केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रियंकाचे आई-वडील पोहचले नसल्याने अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच शवविच्छेदनही करण्यात आलेले नाही, अशी माहिती सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाढ यांनी tv9 ला फोनद्वारे दिली. (The bodies of husband and wife were found in Parbhani)

इतर बातम्या

Revenge | बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या

मुंबईत 27 वर्षीय गायिकेला stalk, लग्नाचीही मागणी, आयटी इंजिनिअरला अटक

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली