AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकलच्या दरवाज्याला लटकणे तरुणांना महागात पडले, तोल गेला अन्…

नालासोपारा / विजय गायकवाड : लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करु नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र प्रवासी प्रशासनाच्या या सुचनेकडून वारंवार दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातातच्या घटना घडतात. अशीच एक घटना नालासोपारा विरार दरम्यान घडली आहे. लोकल ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून प्रवास करताना दोघे तरुण लोकलमधून पडले. परंतु दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले. […]

लोकलच्या दरवाज्याला लटकणे तरुणांना महागात पडले, तोल गेला अन्...
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 27, 2023 | 7:04 PM
Share

नालासोपारा / विजय गायकवाड : लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करु नका अशा सूचना वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र प्रवासी प्रशासनाच्या या सुचनेकडून वारंवार दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातातच्या घटना घडतात. अशीच एक घटना नालासोपारा विरार दरम्यान घडली आहे. लोकल ट्रेनमध्ये दरवाजाला लटकून प्रवास करताना दोघे तरुण लोकलमधून पडले. परंतु दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले. दोघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंटो राजकुमार मोहंतो आणि हरिश्चंद्र तुलसीदास पालव असं दोघांची नाव असून, दोघेही नालासोपारा पूर्व येथील रहिवासी आहेत.

नालासोपाऱ्याहून विरार जात असताना घडली घटना

मुंबईला जाणारी लोकल पकडण्यासाठी विरारला नालासोपाऱ्याहून रिटर्न चालले होते. यावेळी नालासोपारा-विरार दरम्यान दोघेही तोल जाऊन लोकलमधून पडले. सकाळी 8.15 ते 8.25 दरम्यान हा अपघात झाला. दोन वेगवेळ्या लोकल ट्रेनमध्ये या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी तात्काळ तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने यात तरुणांचा जीव बचावला आहे.

रेल्वेच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी विरार स्थानकात घडली आहे. मृतांमध्ये आई-वडिल आणि तीन महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. विरारहून वसईला जाणारी लोकल पकडण्यासाठी एका प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून चालले होते. यावेळी एक्स्प्रेसने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला.

पती-पत्नी सूरत येथून आपल्या नवजात बाळाला घेऊन विरार येथे उतरले. यानंतर विरारहून लोकल पकडून त्यांना वसईला जायचे होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा