लातूरच्या डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर

लातूर : आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबदल लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराने कसलाही स्वार्थ न ठेवता केलेल्या कामाचं आणि आरोग्य सेवेचं सार्थक झालं, असे भावूक उद्गार अशोक कुकडे यांनी व्यक्त केले आहेत. पद्मभूषण हा देशाचा तिसऱ्या क्रमाकांचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. डॉ. अशोक कुकडे हे गेल्या 35 वर्षांपासून …

लातूरच्या डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर

लातूर : आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबदल लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराने कसलाही स्वार्थ न ठेवता केलेल्या कामाचं आणि आरोग्य सेवेचं सार्थक झालं, असे भावूक उद्गार अशोक कुकडे यांनी व्यक्त केले आहेत. पद्मभूषण हा देशाचा तिसऱ्या क्रमाकांचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

डॉ. अशोक कुकडे हे गेल्या 35 वर्षांपासून रुग्णसेवेचं काम करतात, तर आरोग्य सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. विवेकानंद हॉस्पिटल आणि ट्रस्टच्या माध्यमातून ते सामान्य रुग्ण ते कॅन्सर पीडित रुग्ण यांची सेवा करतात. ते चालवित असलेल्या विवेकानंद हॉस्पिटल ट्रस्टच्या माध्यमातून लाखो रुग्णानां मदत झाली आहे.

डॉ. अशोक कुकडे यांनी 1960 च्या सुमारास पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. कुकडे यांचं शिक्षण एम. एस. पर्यंत झालेलं आहे. त्यांच्या पत्नी जोत्सना कुकडे याही स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले डॉ. कुकडे यांनी वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर स्वतःला समाज कार्यात झोकून दिलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *