AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाला जिल्हा परिषदेचं तिकीट, स्थानिकांची मात्र नाराजी

डहाणूतील वणई गटातून रोहित गावित सेना उमेदवार उमेदवार आहेत. रोहित गावित हे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आहेत. विरोध डावलून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रोहित गावितांच्या उमेदवारीला स्थानिकांसह शिवसैनिकांचाही विरोध आहे.

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाला जिल्हा परिषदेचं तिकीट, स्थानिकांची मात्र नाराजी
Rohit Rajendra Gavit
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 23, 2021 | 4:12 PM
Share

पालघर : पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्या मुलाची जिल्हा परिषद निवडणुकीतून राजकारणात एन्ट्री होत आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित (Rohit Rajendra Gavit) यांना संधी देण्यात आली आहे.

रोहित गावितांच्या उमेदवारीला विरोध

डहाणूतील वणई गटातून रोहित गावित सेना उमेदवार उमेदवार आहेत. रोहित गावित हे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आहेत. विरोध डावलून शिवसेनेने उमेदवारी दिल्याने रोहित गावितांच्या उमेदवारीला स्थानिकांसह शिवसैनिकांचाही विरोध आहे.

शिवसेनेत बंडखोरीची शक्यता

दरम्यान, शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक उमेदवाराला डावलून खासदार राजेंद्र गावित यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिल्याने शिवसेनेत आणखी बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत राजेंद्र गावित?

अगदी काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजय मिळवून राजेंद्र गावित याठिकाणी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या राजेंद्र गावित यांनी आतापर्यंत शिवसेना व्हाया भाजप असा रंजक प्रवास केला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी हा भाग डहाणू लोकसभा मतदारसंघात येत असे. या मतदारसंघात पूर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मात्र, राजेंद्र गावित यांनी 2018 मध्ये हे वर्चस्व मोडून काढत भाजपला विजय मिळवून दिला होता.

राजेंद्र गावितांचा राजकीय प्रवास

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी 2018 साली पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने चिंतामण वगना यांचे सुपूत्र श्रीनिवास वगना यांना उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यावेळी भाजपकडून राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवण्यात आले. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी बाजी मारली होती.

मात्र, 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलल्यामुळे शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा दिलजमाई झाली. जागावाटपात पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे राजेंद्र गावित यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना-भाजपच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर राजेंद्र गावित यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या:

पाचवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली, इंदिरा गांधींचा लिटल खासदार, कोण होते दामोदर शिंगडा?

पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली, पुढच्याच निवडणुकीत हातावर बांधलं शिवबंधन; जाणून घ्या कोण आहेत राजेंद्र गावित?

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत