AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली; सुधाकर देशमुख नवे आयुक्त

पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख त्यांची अचानकपणे बदली (Panvel commissioner Ganesh Deshmukh transferred) करण्यात आली आहे.

पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली; सुधाकर देशमुख नवे आयुक्त
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 20, 2020 | 1:54 PM
Share

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची अचानकपणे बदली (Panvel commissioner Ganesh Deshmukh transferred) करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ही बदली करण्यात आली असून गणेश देशमुख यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Panvel commissioner Ganesh Deshmukh transferred)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. मुंबई परिसरातील अन्य महापालिकेत सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यांचा ठपका संबंधित महापालिका आयुक्तांवर ठेवले जात असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची आता पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन महिन्यापूर्वी पनवेल आयुक्त गणेश देशमुख यांनी क्वारंन्टाईन शिक्के असलेल्यांच्या घरी धाडी टाकल्या होत्या. कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्या सदस्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, खुद्द पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींच्या घरात जाऊन झडती घेण्याचे कार्य करत होते. पोलिसांना घेऊन मनपा आयुक्तांनी घरातील सदस्यांना अचानक भेट दिली होती, पण सदस्यच घरी नसल्याने मोठा गोंधळ झाला होता. या तिन्ही दोषी सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी त्यावेळी सांगितले होते.

मुंबई महापालिका आयुक्तांची बदली

काही दिवसापूर्वी म्हणजे 8 मे रोजी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं होतं. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली करुन त्यांच्या जागी इक्बालसिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या  

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...