माधुरी हत्ताणीच्या पुनर्वसनासाठी पेटाची थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव, मठात साखळदंडात जखडलेल्या कैद्याप्रमाणे..

कोल्हापूर येथील नांदणी मठात परतलेल्या माधुरी हत्तीणीचे पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठी अपडेट पुढे येत आहे.  जामनगरमधील वनतारात पुन्हा स्थलांतर करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पेटा इंडियाने सुप्रीम कोर्टात केली.

माधुरी हत्ताणीच्या पुनर्वसनासाठी पेटाची थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव, मठात साखळदंडात जखडलेल्या कैद्याप्रमाणे..
Madhuri elephant
| Updated on: Oct 01, 2026 | 9:38 AM

कोल्हापूर येथील नांदणी मठात परतलेल्या माधुरी हत्तीणीचे पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठी अपडेट पुढे येत आहे.  जामनगरमधील वनतारात पुन्हा स्थलांतर करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पेटा इंडियाने सुप्रीम कोर्टात केली. माधुरी हत्तीण 11 ते 12 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे परतली. तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, कर्णकर्कश घोषणा, ढोलताशांचा आवाजाला सामोरे जावे लागले. आता ती साखळदंडात जखडलेल्या एकाकी कैद्याप्रमाणे जीवन जगते आहे, असा आरोप पेटा इंडियाने केला. माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारात पाठवण्याची थेट मागणी केली. त्यामुळे पुन्हा मोठ्या वादाल तोंड फुटल्याचे बघायला मिळतंय. तत्पूर्वी ती वनतारामध्ये आपल्या मैत्रीण शांतीबरोबर मुक्त विहाराचा आनंद घेत होती. मात्र आता एका शेडमध्ये ती एकाकी असल्याचे या याचिकेत स्पष्ट म्हणण्यात आले.

तिच्या दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी हे ठिकाण अयोग्य असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहेत. मात्र, माधुरी हत्तीण वनतारात गेल्यानंतर नांदणी मठ आक्रमक झाला. यासोबत कोल्हापूरही आक्रमक झाला. याकरिता रस्त्यावर उतरून मोर्चे काढण्यात आली. पेटा इंडियाच्या अर्जात माधुरीला पुन्हा मठात हलवणे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या 16 जुलै 2025 रोजीच्या आदेशाचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 28 जुलै 2025 रोजीच्या आदेशाचे उल्लंघन असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

Loading...

वनताराकडून माधुरी हत्तीणीचा व्हिडीओही शेअर करण्यात आला होता. तिथे ती कशी जगत होती, हे त्या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले. पुन्हा मठात आल्यानंतर तिला साखळदंडात बांधून ठेवण्यात आले. तिथे वनतारामध्ये ती मस्त फिरतानाही दिसली होती. वनतारा येथून हत्तीण माधुरीचे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात पुनरागमन झाले, त्यावेळी तिच्या स्वागतासाठी हजारो लोक दाखल झाले.

एक वर्षांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला यश मिळाले. माधुरी मठात परतल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत हजारो नागरिकांनी माधुरीचे नांदणीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत केले. माधुरीच्या आगमनासाठी नागरिकांनी सायंकाळपासूनच तिची वाट पाहिली होती. त्यातच आता पुन्हा माधुरी वनतारात जाण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us