AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी परत येत नाही तोवर…, महादेवी हत्तीणीसाठी मराठी कलाकार पुढे, ती पुन्हा मठात येणार?

‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आता हत्तीणीला पुन्हा गावात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवाय गावकरी देखील पुढे आले आहेत...

माधुरी परत येत नाही तोवर...,  महादेवी हत्तीणीसाठी मराठी कलाकार पुढे, ती पुन्हा मठात येणार?
फाईल फोटो
| Updated on: Aug 02, 2025 | 8:45 AM
Share

माणसांपेक्षा प्राण्यांची माया, प्रेम फार मोलाचं असतं म्हणतात आणि ते खरं देखील आहे. सध्या ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माधुरीला निरोप देताना गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

गावातून हत्तीणी देखील जायचं नव्हतं स्वतः माधुरी देखील गाव सोडून जाताना रडली. आता गावार पुन्हा माधुरीला आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. यावर मराठी कलाकर देखील पुढे येत स्वतःचं मत व्यक्त करत आहेत. अनेत सेलिब्रिटींनंतर स्वप्नील राजशेखर यांनी देखील इन्स्टाग्रामवर माधुरीचा फोटो पोस्ट केला आहे.

अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत… @PETA ही वन्यजीवांसाठी अनेक ठिकाणी उपकारक कार्य करत असेल.. परंतु “माधुरी” हत्तीणीबाबत मात्र थोडा आतताईपणा झालाय… इतकी वर्षे त्या मुक्या जिवाची आणि ग्रामस्थांची एकमेकांत मानसिक गुंतवणूक इतकी गहरी झालीय की हा दुरावा त्यांना मानवणारा नाही…शिरोळकर आक्रमक झाले आहेतच.. पण देव न करो तिकडे माधुरी आक्रमक झाली किंवा विरहाने तीच्या प्रकृतीवर बेतलं तर PETA च्या मूळ उद्देशालाच गालबोट लागेल….

अनेकदा नियम आणि कल्याणकारी वाटणारे उपाय सुध्दा परिस्थितीनुरुप बदलले जायला हवेत. प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा यांचं मोल जाणुन मग निर्णय घ्यायला हवेत… माधुरी परत येत नाही तोवर ग्रामस्थ सुखाचा श्वास घेणार नाहीत आणि कदाचीत ती गजस्वामिनी सुध्दा…, सध्या स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, हत्तीणी अद्याप गुजरात येथे आहे, पण तिची नांदणी मठात परतण्याची शक्यता दाट आहे. कारण ग्रामस्थांच्या वेदना आणि प्रशासनावर असलेला दबावामुळे माधुरी पुन्हा तिच्या गावी परतण्याची शक्यता आहे. सामाजिक दबाव आणि राजकीय बैठका पुढील निर्णयांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतील… असं देखील सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, गावकऱ्यांनी ‘Jio Ban’ मोहीम सुरू केली आणि सिम‑पोर्टिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.