PM Modi In Maharashtra : पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो भवनचं भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभर महाराष्ट्र दौऱ्यावर (PM Modi Maharashtra visit) आहेत. मुंबई आणि औरंगाबादमधील विविध कार्यक्रमांना मोदी हजेरी लावत आहेत.

PM Modi In Maharashtra : पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो भवनचं भूमिपूजन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभर महाराष्ट्र दौऱ्यावर (PM Modi Maharashtra visit) आहेत. मुंबई आणि औरंगाबादमधील विविध कार्यक्रमांना मोदी हजेरी लावत आहेत. पंतप्रधान मोदी नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणं अपेक्षित होतं. पण नागपुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र मोदी औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमाला (PM Modi Maharashtra visit) हजेरी लावणार आहेत. नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होतं. पण तो दौरा रद्द करण्यात आला आहे.

LIVE UPDATE

Picture

मोदींचा मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद

मेट्रो कोचचे उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींचा मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद, मोदींकडून मेट्रो कोचमधील सुविधांची अत्यंत बारकाईने पाहाणी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर, उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन

07/09/2019,11:45AM
Picture

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो भवनचं भूमिपूजन

07/09/2019,11:38AM
Picture

पंतप्रधान मोदी गणपतीच्या दर्शनाला

07/09/2019,11:01AM
Picture

मोदींचं मुंबईत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन, स्वागतासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह दिग्गज उपस्थित

07/09/2019,10:56AM

मुंबईतील कार्यक्रम

मुंबईत मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्प भूमीपूजन करण्यात येणार आहे. पण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याने शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. बीकेसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमीपूजन केलं जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आलं असून ते विशेष अतिथी आहेत.

वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो 11 प्रकल्पासाठी आपण पाठपुरावा केल्याचा शेवाळे यांचा दावा दावा आहे. माझ्या दक्षिण मध्य मतदार संघातून मेट्रो 11 धावणार आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत माझं नाव असणं आवश्यक होतं, अशी भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली. दरम्यान, शेवाळे यांना MMRC कडून कार्यक्रमाचं रितसर आंमत्रण मिळाल्याने ते कार्यक्रमाला जाणार आहेत.

औरंगाबादेत इम्तियाज जलील यांचा विरोध

पंतप्रधान मोदींचा औरंगाबादमध्येही कार्यक्रम होणार आहे. पण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) द्वारे शनिवारी दुपारी 12.30 वाजता DMIC, शेंद्रे, औरंगाबाद येथे “सक्षम महिला मेळावा” चं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे महिलांना संबोधित करणार आहेत.

औरंगाबादमध्ये जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. एक हजार महसूल कर्मचाऱ्यांसह 3 हजार पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, औरंगाबाद ग्रामीण पोलीस आणि औरंगाबाद शहर पोलिसांचा ताफा मोदींच्या दौऱ्यासाठी सज्ज आहे.

डीएमयसीच्या औरीक सिटी हॉलचे उद्घाटन करून राज्यातील 1 लाख बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

औरंगाबादमध्ये दोन घोषणा

औरंगाबाद शहरात दोन प्रमुख कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत. यातला पहिला कार्यक्रम म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या (AURIC City) भव्य हॉलचे त्यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी (PM Modi Aurangabad) संबोधित करणार आहेत. मोदी (PM Modi Aurangabad) महाराष्ट्रासाठी दोन खास गोष्टी देणार आहेत. एक म्हणजे हजारो हातांना काम देणाऱ्या औरीक सिटीचं (AURIC City) मुख्यालयाचं उद्घाटन आणि दुसरं महिलांसाठी खास घोषणा केली जाऊ शकते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *