बारामतीतही पंतप्रधान मोदींची सभा होणार

पुणे : महाराष्ट्रात भाजप यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा जिंकेल आणि त्यात बारामतीचाही समावेश असेल, असा दावा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. त्याच दिशेने आता भाजपने कंबर कसल्याचं दिसतंय. बारामतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बारमतीतही सभा होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश बापट […]

बारामतीतही पंतप्रधान मोदींची सभा होणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुणे : महाराष्ट्रात भाजप यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा जिंकेल आणि त्यात बारामतीचाही समावेश असेल, असा दावा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. त्याच दिशेने आता भाजपने कंबर कसल्याचं दिसतंय. बारामतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बारमतीतही सभा होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

गिरीश बापट हे स्वतः पुण्यातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ पुण्यात असलेल्या सभेपूर्वी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 2014 लाही भाजपने बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यात भाजपचे उमेदवार महादेव जानकर यांचा 70 हजार मतांनी पराभव झाला होता. यावर्षी रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढत आहेत.

कोण आहेत कांचन कुल 

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या पवार कुटुंबीयांच्या अर्थात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नात्यातील आहेत. कांचन कुल दौंडमध्ये काही प्रमाणात सक्रिय आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग दिसून येतो. त्यांचे पती राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी मानले जातात. 2014 साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत राहुल कुल यांनी माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचा पराभव केला होता.

मताधिक्य घटणार की वाढणार 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न यामुळे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीची अक्षरश: कोंडी झाली होती. मात्र बारामती, इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांची साथ मिळाल्याने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यावेळी दौंडमधून महादेव जानकर यांना तब्बल 25 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. तर पुरंदर, खडकवासला मतदारसंघातही जानकर आघाडीवर होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंडमध्ये राहुल कुल हे तब्बल 11 हजार 345 मतांनी निवडून आले होते. सद्यस्थितीचा विचार करता दौंडसह मागच्या निवडणुकीप्रमाणेच मताधिक्य घटणार की वाढणार हेही पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.