तब्बल 750 रुग्णांना प्लाझ्मा, 16 रक्तदान शिबिरं, 89 वेळा रक्तदान; थोरात सरांच्या थोरवीची कोरोनाकाळात चर्चा

| Updated on: May 04, 2021 | 6:32 PM

या कठीण काळात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या किरण थोरात यांचे नाव समोर येत आहे. त्यांचं नाव आजकाल सर्वांच्या तोंडावर आहे. (kiran thorat corona patient plasma)

तब्बल 750 रुग्णांना प्लाझ्मा, 16 रक्तदान शिबिरं, 89 वेळा रक्तदान; थोरात सरांच्या थोरवीची कोरोनाकाळात चर्चा
KIRAN THORAT
Follow us on

ठाणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो रुग्ण वाढत असल्यामुळे सध्या धांदल उडालेली आहे. आपापल्या रुग्णाला वाचवण्यासाठी अनेक नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच प्लाझ्म डोनस शोधण्यासाठी धावपळ करताना दिसतायत. एवढे सारे प्रयत्न करुनसुद्धा रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच प्लाझ्मा डोनर मिळणे कठीण होत चालले आहे. मात्र, या कठीण काळात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या किरण थोरात यांचे नाव समोर येत आहे. त्यांचं नाव आजकाल सर्वांच्या तोंडावर असून जिथे मदतीची गरज असते तिथे ते धावून जाताना दिसतायत. (police appreciated social work of Kiran Thorat who has helped Corona patient to get plasma and blood)

प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी धडपड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्लाझ्माची गरज मोठ्या प्रमाणात भासते आहे. किरण थोरात यांना मदतीसाठी मराठवाडा, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर येथून फोन कॉल्स येत आहेत. एवढेच नाही तर मध्यप्रदेश आणि दिल्ली येथूनसुद्धा मदतीसाठी कॉल्स येत असल्याचे थोरात यांनी सांगितले. मदतीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात याचना होत असल्यामुळे थोरात त्यांच्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत असल्याचे ते सांगतात. त्यांनी आतापर्यंत 750 रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. तसेच कोरोनाकाळात 16 रक्तदान शिबिरं आयोजित करून वैयक्तिररीत्या 300 जणांना त्यांनी रक्त उपलब्ध करून दिले आहे. या लढ्यात त्यांनी  स्वतः 89 वेळा रक्तदान केले आहे.

तुटपुंजा पगार तरीही मदतीसाठी तत्पर

किरण थोरात हे पालघर येथे सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात क्रीडा प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. मागील दहा वर्षापासून सेवेत असून त्यांना अत्यंत तुटपुंजा पगार आहे. पगार कमी असूनसुद्धा त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. या कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात टाकून ते काम करत आहेत.

आणखी काम करणे गरजेचे

दरम्यान, त्यांचे समाजसेवेचे काम फक्त कोरोनाकाळातच सुरु नाही. तर याआधीसुद्धा त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. थोरात यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. पोलीस विभागानेसुद्धा त्यांचा सत्कार केलाय. याबद्दल विचारले असता, हा सन्मान मिळाल्याचे समाधान तर आहेच, पण त्यासोबतच सध्याच्या काळात आणखी काम करणे गरजेचे आहे, असे ते आवर्जून सांगतात.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : वाशिममध्ये दिवसभरात आढळले 582 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

महाराष्ट्राला वॅक्सिनची दैनंदिन गरज 8 लाख, मिळतायत 25 हजार, टोपेंची लस तुटवड्यावर माहिती

(police appreciated social work of Kiran Thorat who has helped Corona patient to get plasma and blood)