Maharashtra Coronavirus LIVE Update : पुणे शहराला 30 हजार लसी मिळाल्या, ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरु होणार

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 22:34 PM, 4 May 2021
Maharashtra Coronavirus LIVE Update : पुणे शहराला 30 हजार लसी मिळाल्या, ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरु होणार
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 04 May 2021 22:34 PM (IST)

  अकोला जिल्ह्यात दिवसभरात 484 नवे रुग्ण

  अकोला कोरोना अपडेट :

  आज दिवसभरात 484 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…

  2279 अहवाला पैकी 1795 जणांचे अहवालात निगेटिव्ह आले आहेत…

  ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 42427 झाला आहे….

  आज दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे….

  कोरोनामुळे आतापर्यंत 737 जणांचा मृत्यू …

  आज दिवसभरात 475 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…

  तर 35998 जणांनी कोरोनावर मात केली आहे….

  उपचार घेत असलेले रुग्ण 5692 आहेत……

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती…..

 • 04 May 2021 21:39 PM (IST)

  पुणे शहराला 30 हजार लसी मिळाल्या, ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरु होणार

  पुणे शहराला 30 हजार लसी मिळाल्या

  उद्यापासून 45 वर्षांवरील नागरिकांच लसीकरण ठराविक केंद्रावर होणार सुरु

 • 04 May 2021 20:30 PM (IST)

  साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निमित्तीचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्टचे काम अंतीम टप्प्यात

  साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्टचे काम अंतीम टप्प्यात असून आगामी 4 दिवसात ऑक्सिजन गुणवत्ता चाचणी आणि तपासणी झाल्यावर ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीला सुरुवात होणार असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव कारखान्यात या प्रकल्पासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात आली असून याची चाचणी बाकी आहे. या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना पत्र दिले आहे, त्यास प्रमाणित केल्यावर मान्यता मिळताच तात्काळ मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 • 04 May 2021 20:26 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 51 हजार 880 नवे बाधित, 891 रुग्णांचा मृत्यू

  राज्यात आज 51 हजार 880 नवे रुग्ण, राज्यात आज 891 रुग्णांचा मृत्यू, राज्यात आज 65 हजार 934 रुग्णांनी केली कोरोनावर मात

 • 04 May 2021 20:13 PM (IST)

  रायगड जिल्ह्यात लसीकरण केद्रांच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश

  रायगड : जिल्ह्यात लसीकरण केद्रांच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे (144 (2) कलम) आदेश लागू

  जिल्हाधिकारी निधी चोधरी यांनी आज प्रशासनाला दिले आदेश

  कायदा व सुव्यवस्था तसेच आदेशाचे उल्लघंन करण्याऱ्यांवर  फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

  केवळ 18-44 वयोगटातील पूर्व नोदंणीनुसार लसीकरणासाठी येण्याची परवानगी

  लसीकरण केद्रांशी निगडीत वैद्यकिय सेवा पुरवणारी व्यक्ती किवां पोलीस अधिकारी यानांच लसीकरण केद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रवेश

   

 • 04 May 2021 19:26 PM (IST)

  नांदेडमध्ये 490 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

  नांदेड – कोरोना अपडेट

  24 तासात 490 पॉझिटिव्ह रुग्ण

  2077 चाचण्यांपैकी 490 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

  एकूण बाधित रुग्ण- 82473

  बरे झालेले रुग्ण- 72309

  24 तासात 15 जणांचा मृत्यू

  आतापर्यंत एकूण मृत्यू- 1639

  सक्रिय रुग्ण 8263

  295 रुग्णांची प्रकृती गंभीर

 • 04 May 2021 19:10 PM (IST)

  सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 2009 नवे रुग्ण

  सोलापूर – सोलापूर  जिल्ह्यात आज कोरोनाचे 2009 नवे रुग्ण

  तर 47 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये शहरातील 18 तर ग्रामीण भागातील 29 जणांचा मृत्यू

  ग्रामीण भागात 1841 तर शहरात कोरोनाचे 168 रुग्ण

 • 04 May 2021 19:09 PM (IST)

  वसई विरारमध्ये 405 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

  वसई विरार कोरोना अपडेट

  – वसई विरारकरांना मोठा दिलासा

  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

  – दिवसभरात 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले

  तर 405 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते

  दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 1141  वर

  वसई विरार महापालिकेत रुग्णसंख्या 56237 वर पोहोचली

  एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या- 1141

  कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 44167

  कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या- 10929

 • 04 May 2021 18:49 PM (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यात 24 तसांत 1170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  चंद्रपूर:  24 तसांत 1170 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 22 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 65038

  एकूण कोरोनामुक्त : 47217

  सक्रिय कोरोना रुग्ण : 16823

  एकूण मृत्यू : 998

  एकूण नमुने तपासणी : 394818

 • 04 May 2021 18:47 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात लसीचा भीषण तुटवडा, येवला तालुक्यातील लसीकरण बंद

  नाशिक जिल्ह्यात लसीचा भीषण तुटवडा

  – येवला शहरासह तालुक्यातील पाच ठिकाणी उद्याचे लसीकरण बंद

  – निफाड तालुक्यातील लासलगाव येथेसुद्धा उद्याचे लसीकरण बंद

 • 04 May 2021 18:45 PM (IST)

  निफाड तालुक्यात दिवसभरात 185 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  निफाड तालुका कोरोना अपडेट

  दिवसभरात कोरोनाच्या 185 नव्या रुग्णांची नोंद

  – निफाड तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण – 15679

  – एकूण बरे झालेले रुग्ण – 13354

  – रिकव्हरी रेट 85.17 टक्क्यांवर

  – आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 486

  सध्याचा मृत्यूदर – 3.10  टक्क्यांवर

  – सध्या 1839 रुग्णांवर उपचार सुरु

   

 • 04 May 2021 18:03 PM (IST)

  वाशिममध्ये दिवसभरात आढळले 582 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

  वाशिम कोरोना अलर्ट

  जिल्ह्यात आज 03 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

  दिवसभरात आढळले 582 नवे रुग्ण

  दिवसभरात 329 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 34 दिवसात 126 रुग्णांचा मृत्यू

  तर 13499 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 29574

  सध्या सक्रिय रुग्ण – 4169

  एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण – 25091

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 313

 • 04 May 2021 17:19 PM (IST)

  राज्यात पॉझिटिव्हीटी रेट 27 वरुन 22 टक्क्यांवर, रिकव्हरी रेट 84.7 टक्क्यांवर- राजेश टोपे

  आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पत्रकारांशी संवाद साधत आहेत. यामध्ये ते कोरोनाविषयक माहिती देत आहेत. सध्या राज्यात 84.7 टक्के रिकव्हरी रेट आहे. तसेच देशाच्या रिकव्हीर रेटपेक्षा देशाचा रेट जास्त आहे, असे ते म्हणाले. राज्यात पॉझिटिव्हीटी रेट 27 वरुन 22 टक्क्यांवरुन आला आहे.  ऑक्सिजनचा महत्त्वाचा विषय आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचं आपण ठरवलं आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लिकेज थांबवणे, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे. ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात आपण 150 पेक्षा जास्त प्लांटची ऑर्डर दिली आहे. तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वंयपूर्ण झालंच पाहिजे अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमंत्र्यांची अपेक्षा  आहे.

  रुग्णसंख्या हळूहळू घटत आहे

  महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटतेय मात्र त्याचवेळी दुसरीकडे 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे हेण्याचं प्रमाण चांगलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. राज्यात रुग्णसंख्या हळूहळू घटत आहे.

  लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर

  लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलं आहे. राज्यात रेमडेसिव्हीर साडे तीन लाखांपर्यंत उपलब्ध होतील. सध्या आपण 40 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला 20 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर  उपलब्ध होतील.

  राज्यात 9 लाख डोसेस आले 

  लस हा एक महत्त्वाचा विषय आहे. 45 वर्षे तसेच पुढील वय असलेल्या नागरिकांसाठी फक्त 30 हजार व्हॅक्सीन उपलब्ध होत्या. सध्या राज्यात 9 लाख डोसेस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी हे डोस द्यायचे आहेच. राज्यात सर्व ठिकाणी ते वितरित केले जातील. 1 कोटी 65 लाख नागरिकांना आपण लस दिलेली आहे. हे सर्व नागरिक 45 वर्षापेक्षा जास्त आहेत.

  18 ते 44 वयोगटातील 1 लाख लोकांना लस दिली

  देशात चार पाच राज्यांमध्ये 1 मेला लसीकरण सुरु केलं. त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे. लसीकरणाच्या मोहिमेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. एक मेच्या आधी फक्त 3 लाख लसी मिळाल्या. या सर्व लसी घेऊन आम्ही 1 तारखेलाच लसीकरणाचा कार्यक्रम सुर केला. 18 ते 44 वयातील 1 लाख लोकांना लस दिलेली आहे. कोव्हीशील्ड लसीला 13  लाख 80 हजार डोसेसची पर्चेस ऑर्डर दिलेली आहे. तर कोव्हॅक्सीन लसीसाठी 4 लाख 79 डोसेसची पर्चेस ऑर्डर दिलेली आहे.  असे साधारण मिळून 18 ते साडे अठरा लसींची ऑर्डर दिलेली आहे.

  लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये

  माझी महाराष्ट्रातील तरुणाईला विनंती आहे की रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट दिल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. मी एक खात्रीपूर्वक सांगतो की, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री  तसेच सर्व मंत्र्यांचं मत हे एका चेकमध्ये लसी खरेदी करुयात असे आहे. मात्र, सध्या लसी उपलब्ध होत नाहीयेत. सध्या स्पुटनिक लससुद्धा आलेली आहे. त्याविषयी दर ठरवणे बाकी आहे. त्यानंतर ही लससुद्धा मिळेल. पुण्याचे अदर पूनावाला यांच्याशीसुद्धा चर्चा सुरु आहे. ते विदेशातून परत आल्यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करु.

  ग्लोबल टेंडरमधून अनेक देशांनी प्रतिसाद दिला आहे. ज्या देशांकडून आपल्याला ऑक्सिजन लवकर मिळेल त्यांच्याकडून तो लवकर खरेदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लिक्विड ऑक्सिजनसाठीसुद्धा काही ऑफर्स आल्या आहेत. त्याविषयी जसे निर्णय होतील ते कळवत राहू.

  राज्याला साडेबारा हजार मेट्रिक टन ऑक्सिजन केंद्राकडून मिळत आहे. आपण ऑक्सिजन ओडिसा येथूनसुद्धा आणत आहोत. सध्या आपण एअर लिफ्टिंग करुन ऑक्सिजन आणत आहोत. आपल्याला अनेक पद्धतीने मदत होत आहे. मास्क, व्हेंटीलेंटर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर दिले जात आहे. सीएसआरच्या माध्यमातून आपण कशी मदत मिळत मिळू शकेल याचा प्रयत्न सुरु आहे.

   

 • 04 May 2021 17:03 PM (IST)

  उस्मानाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा मृतदेह उघड्यावर पडून, नागरिकांत संताप

  उस्मानाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा मृतदेह पाच तास खासगी रुग्णालयासमोर उघड्यावर पडून

  उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एका खासगी दवाखान्यासमोरील घटना

  एका 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडल्याचे उघड

  मृतदेह उघड्यावर पडल्यामुळे नागरिकांत संताप

 • 04 May 2021 16:25 PM (IST)

  मुंबई पालिकेकडून कोरोना चाचणी अहवाल उशिराने दिला जातोय : सोमय्या

  मुंबई : आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे मुंबई महानगरपालिकेकडून कोविड पॉझिटिव्ह अहवाल 3 दिवसांसाठी लांबविला जात असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे.

  कोरोना चाचणीचा रिपोर्ट मुद्दामहून 3 दिवस उशिरा देण्याच्या सूचना पालिकेने दिल्याचा आरोप सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

  चाचणी अहवला उशिरा मिळत असल्यामुळो उपचार मिळण्यास विलंब होत आहे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेसुद्धा सोमय्या यांनी म्हटले आहे.

   

 • 04 May 2021 16:03 PM (IST)

  रेमिडेव्हीर, ऑक्सिजनचा पुरवठा 10 दिवसांत सुरळीत होणार – विजय वडेट्टीवार 

  रेमिडेव्हीर, ऑक्सिजनचा पुरवठा पुढच्या 10 दिवसांत व्यवस्थित केला जाईल- विजय वडेट्टीवार

  रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढलंय

  त्याला काही कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय

  ऑक्सिजनचासुद्धा पुरवठा योग्य प्रकारे केला जाईल

  केंद्रानं लॉकडाऊन लावला तर देर आये दुरुस्त आये, असे म्हणावे लागेल

  आम्ही आधी लावला तर त्याला विरोध करण्यात आला

  आता त्यामुळेच रुग्णसंख्या कमी होतेय

  कंगनाचं ट्विटर ब्लॉक केलं ते योग्यच केलं

  कोणीही काहीही बोलावं हे योग्य नाही

  ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ओळखावी

  जेवढी मर्यादा असेल तेवढंच बोलावं

  कोणाच्या पक्षाची बाजू घेऊन बोलू नये- विजय वडेट्टीवार

 • 04 May 2021 15:47 PM (IST)

  राज्यात ऑक्सिजनची गरज वाढली, 200 मेट्रिक टनने ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची मागणी

  राज्यातील ऑक्सिजनची गरज वाढत असून केंद्राने सध्याचा पुरवठा आणखी 200 मेट्रिक टनाने वाढवावा अशी विनंती राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनची गरज वाढत आहे. हे लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरु करण्यात व्यक्तिगत लक्ष घालावे असे पत्र मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना लिहले आहे.

 • 04 May 2021 14:21 PM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात उद्या दुपारपासून कडक लॉकडाऊन, सतेज पाटील यांची माहिती

  कोल्हापूर जिल्ह्यात उद्या दुपारपासून कडक लॉकडाऊन

  कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

  थोड्याच वेळात नियमावली जारी केली जाणार

  कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे 10 दिवस कडक लॉकडाऊन

 • 04 May 2021 14:17 PM (IST)

  सांगलीत उद्यापासून सात दिवसांचा जनता कर्फ्यु, खरेदीसाठी बाजारात नागरिकांची तोबा गर्दी

  सांगलीत उद्यापासून सात दिवसांचा जनता कर्फ्यु, खरेदीसाठी बाजारात नागरिकांची तोबा गर्दी

  बुधवार 5 मे पासून 11 मे पर्यंत मनपाक्षेत्रात कडक जनता कर्फ्यु

  या जनता कर्फ्युमधून वैद्यकीय सेवा, मेडिकल आणि दूध व्यवसाय वगळण्यात आलाय

  अन्य सर्व आस्थापना आणि व्यवसाय हे सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय

  मार्केट मध्ये किराणा, भाजीपाला, खरेदीसाठी तोबा गर्दी

  पोलिसांची गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांची दमछाक

   

 • 04 May 2021 13:53 PM (IST)

  मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

  – मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळण्याची शक्यता

  – आज बीएमसी यासंबंधी मोठा निर्णय घेण्याचा शक्यता, सूत्रांची माहिती

  – डोर टू डोर लस देण्याची मागणी २९ एप्रिल रोजी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी बीएमसीकडे केली होती…

  – 29 एप्रिल रोजी बीएमसी आयुक्तांना पत्र लिहिले होते

  – बीएमसीच्या सहकार्याने स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय सुविधेसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

  – झोपडपट्ट्यांमध्ये व सोसायट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही त्रास न देता सहजपणे लस मिळू शकेल.

  – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, लोकांना लस लवकर दयायची आहे,

  – हे लक्षात घेऊन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी बीएमसीकडे डोर टू डोर लस देण्याची मागणी केली होती,

 • 04 May 2021 13:51 PM (IST)

  सांगलीत मृत व्यक्तीचे विनाचाचणी करता बनावट कोविड-19 चे रिपोर्ट देणाऱ्याला अटक

  सांगली –

  मृत व्यक्तीचे विनाचाचणी करता बनावट कोविड-19 चे रिपोर्ट देणाऱ्याला अटक

  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

  स्वप्नील बनसोडे असे अटक वैक्ती चे नाव

  जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम याची माहिती

 • 04 May 2021 12:41 PM (IST)

  काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीत सुधारणा

  पुणे –

  – काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या तब्बेतीत सुधारणा,

  – ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल असून उपचाराला सातव यांचा चांगला प्रतिसाद,

  – येत्या दोन ते तीन दिवसात राजीव सातव यांची तब्बेतीत आणखी सुधारणा होणार, डॉक्टरांची माहिती,

  – गेल्या 23 तारखेपासून राजीव सातव यांच्यावर जहाँगिर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 • 04 May 2021 11:50 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नवीन भोसरी रुग्णालयात आज नर्स कामावरच गेल्या नाहीत

  पिंपरी चिंचवड

  – कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नवीन भोसरी रुग्णालयात आज नर्स कामावरच गेल्या नाहीत

  – बँक खात्यात पगाराचे पैसे जमा झाले नसल्याने नर्स गेल्या नाहीत कामावर

  – रुग्णालयात 60 पुरुष आणि 30 महिला घेत आहेत उपचार,यामधील काही रुग्ण हे ऑक्सिजन वर घेत आहेत उपचार

  – सकाळ पासून नर्स नसल्याने रुग्णांना इंजेक्शन आणि इतर औषध उपचारांना उशीर

  – काही वेळा पूर्वी इतर रुग्णालयातील नर्स ना रुग्णालयात पाठवण्यात आले

 • 04 May 2021 11:47 AM (IST)

  मुंबई शहर आणि उपनगरमधील रुग्ण संख्या घटली, याचं श्रेय सर्वांचं आहे – महापौर

  महापौर किशोरी पेडणेकर –

  मुंबई शहर आणि उपनगरमधील रुग्ण संख्या घटली आहे

  आयसीएमआर ने म्हटलं आहे की मुंबईतील रुग्ण संख्या घेतली आहे

  याचं श्रेय सर्वांचं आहे

  लहान मुलांसाठी नवीन कोरोना वॉर्ड तयार करत आहोत

  लोकशाही आहे भाजपला आंदोलन करण्याचा अधिकार आहे , पण हे आंदोलन कोणाच्या जीवावर उठल नाही पाहिजे

  केंद्रात तुमची सत्ता आहे, लस उपलब्ध करा

  लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे , म्हणून स्पेशल वॉर्ड बनवलं जाणार आहे

 • 04 May 2021 11:46 AM (IST)

  सोलापुरात 11 नंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांची कारवाई

  सोलापूर –

  11 नंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांची कारवाई

  शहरात 13 ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई

  दुचाकीवर फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई

 • 04 May 2021 11:11 AM (IST)

  अहमदनगरात भाजीपाला विक्रीला बंदी असतानाही अनेक ठिकाणी भाजी विक्री सुरु, नागरीकांची गर्दी

  अहमदनगर

  भाजीपाला विक्रीस बंदी असतांना अनेक ठिकाणी भाजी विक्री सुरू,

  भाजी घेण्यासाठी नागरीक करताय गर्दी,

  तर अनेक ठिकाणी नाका बंदी, जिल्हा बाहेरून येणाऱ्याची पोलीस करताय चौकशी

 • 04 May 2021 10:40 AM (IST)

  सातारा पोलीस पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर

  सातारा पोलीस पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर

  कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दुकाने सुरु ठेवणारयावर पोलिसांची धडक कारवाई

  भाजी विक्री तसेच दुकाने सुरु ठेवणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांकडून लाठीचा प्रसाद

  विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

 • 04 May 2021 10:39 AM (IST)

  सोलापुरात बल्लारीहून रोज 10 ते 12 टन तर पुण्याहून 20 टनचा ऑक्सिजनचा पुरवठा

  सोलापूर –

  सोलापुरात बल्लारीहून रोज 10 ते 12 टन तर पुण्याहून 20 टनचा ऑक्सिजनचा पुरवठा

  खासगी रुग्णालयाला मागणीनुसार दोन ते पाच टनांपर्यंत केला जात आहे पुरवठा

  रुग्णांची संख्या पाहून दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजन रुग्णालयांना केले जात पुरवठा

  जिल्ह्यातील एकही रुग्णालयाला ऑक्सीजन कमी पडणार नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

  विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 17 हजारावर

 • 04 May 2021 10:16 AM (IST)

  राहुल गांधींची संपूर्ण लॉकडाऊनची मागणी

  काँग्रेसचे नेते राहुल गांधींची संपूर्ण लॉकडाऊनची मागणी, ट्वीट करत केली मागणी

 • 04 May 2021 09:50 AM (IST)

  कोरोनाचा काहीसा दिलासा! नवीन बाधीत रुग्णसंख्या झाली कमी तर बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ

  नाशिक –

  कोरोनाचा काहीसा दिलासा

  नवीन बाधीत रुग्णसंख्या झाली कमी तर बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ

  जिल्ह्यात दिवसभरात, कोरोना बाधितांच्या संख्येत 2720 रुग्णांनी झाली वाढ

  तर 3583 रुग्ण कोरोना मुक्त

  दिवसभरात 32 जणांचा मृत्यू

  बळींची संख्या 3 हजार 600

  नाशिक ग्रामीण भागात लक्षणीय सुधार

 • 04 May 2021 09:47 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

  पुणे –

  पुणे जिल्ह्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट,

  दोन खाजगी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये आढळून आले बोगस डॉक्टर,

  जिल्ह्यातील सर्वच खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांची वैद्यकीय पदवी तपासण्याचे जिल्हा परिषद, आरोग्य विभागाचे आदेश,

  बोडस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवाला होऊ शकतो धोका,

  डॉक्टर, फिजीशीयन यांची सगळी माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला कळवण्याचे दिले आदेश,

  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी काढले आदेश….

 • 04 May 2021 09:31 AM (IST)

  सोलापुरात चार दिवसानंतरही लसीकरण ठप्प

  सोलापूर –

  चार दिवसानंतर ही जिल्ह्यातील लसीकरण ठप्प

  आरोग्य विभागाकडून लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण ठप्प

  लसीसाठी नागरिकांचे हेलपाटे सुरूच

  जिल्ह्यासाठी शासनाकडून लसीचा पुरवठा थांबला

  गेल्या आठवड्यात 18 हजार आणि त्यानंतर साडेसात हजार लसींचे डोस झाले होते प्राप्त

  आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याला तीन लाख 23 हजार 330 कोवीशील्ड, तर 2 हजार 320 कोव्हकिशिन डोसचा पुरवठा

  लसीकरणाला प्रतिसाद वाढला असताना पुरवठा थांबल्याने लसीकरण मोहिमेला आलेल्या अडचणी

 • 04 May 2021 08:50 AM (IST)

  सातारा जिल्हयात 7 दिवसाच्या कडक लाॅकडाऊनला आजपासून सुरुवात 

  सातारा जिल्हयात 7 दिवसाच्या कडक लाॅकडाऊनला आजपासून सुरुवात

  शहरातील पोवई नाक्यावर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

  सातारा शहरात अजुनही नागरिक विनाकारण रस्त्यावर

  अत्यावश्यक सेवेच्या दुकानासह इतर सर्व दुकाने आजपासून बंद

  अत्यावक्षक सेवेतील घरपोच सेवा राहणार सुरु

 • 04 May 2021 08:46 AM (IST)

  सातारा जिल्हयात 7 दिवसाच्या कडक लाॅकडाउनला आजपासुन सुरुवात

  सातारा जिल्हयात 7 दिवसाच्या कडक लाॅकडाउनला आजपासुन सुरुवात….

  शहरातील पोवई नाक्यावर पोलिसांकडुन कारवाईला सुरवात….

  सातारा शहरात अजुनही नागरिक विनाकारण रस्त्यावर….

  अत्यावश्यक सेवेच्या दुकानासह इतर सर्व दुकाने आज पासुन बंद…

  अत्यावक्षक सेवेतील घरपोच सेवा राहणार सुरु….

 • 04 May 2021 08:32 AM (IST)

  200 विद्यार्थ्यांना घेऊन वर्ग भरवणाऱ्या बी. पी. मरीन अकादमीच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल,

  बी पी मरीन अकादमीच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

  200 विद्यार्थ्यांना घेऊन वर्ग भरवणाऱ्या बी पी मरीनवर कारवाई

  अकादमीतील 20 विद्यार्थी पॉझिटिव्ह

  अकादमीचे प्राचार्य कॅप्टन दुबे आणि व्यवस्थापकीय मंडळ यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  सर्व महाविद्यालय, वसतिगृह बंद ठेवण्याचा निर्णय असताना 200 मुलं एकत्र ठेवली

  एक विद्यार्थी पॉसेटिव्ह आला असताना उपचार केला नसल्याचा Abvp चा आरोप

  पनवेल बंदर रोड, जुने कोर्ट जवळ आहे बी पी मरीन अकादमी

  पनवेल मनपा कडून सर्व विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली

 • 04 May 2021 07:55 AM (IST)

  6 महिन्यांपासून तयार कुर्ला भाभा रुग्णालयात तयार असलेली ऑक्सिजन टाकी अखेर कार्यान्वित

  मागील 6 महिन्यांपासून तयार कुर्ला भाभा रुग्णालयात तयार असलेली ऑक्सिजन टाकी अखेर कार्यान्वित झाली

  या टाकीत 1700 लीटर लिक्विड ऑक्सिजनचा साठा भरण्यात आला

  अनिल गलगली यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे

 • 04 May 2021 07:36 AM (IST)

  नवी मुंबईत रेमडेसीव्हीरचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथक

  नवी मुंबई –

  रेमडेसीव्हीरचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथक

  नवी मुंबई मनपानं केली विशेष भरारी पथकाची स्थापना

  रिकाम्या कुप्या, इंजेक्शनसाठ्याची होणार तपासणी

  रेमडीसीवर काळा बाजार रोखण्यासाठी मनपा कडून उपाययोजना

  रुग्णालयांनी नातेवाईकांना रेमडीसीवरसाठी औषध चिठ्ठी दिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावणार

  भरारी पथक तक्रारीवरून रुग्णालयात जाऊन साठा आणि प्रत्यक्षात रेमडीसीवर वापर याची तपासणी करणार

 • 04 May 2021 07:10 AM (IST)

  नागपूर जिल्हयात 26 दिवसानंतर रुग्णसंख्या पाच हजारच्या खाली

  – नागपूर जिल्हयात 26 दिवसानंतर रुग्णसंख्या पाच हजारच्या खाली

  – जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

  – जिल्ह्यात 24 तासांत 6601 रुग्ण झाले कोरोनामुक्त

  – जिल्हयात 24 तासांत 4987 नव्या कोरोना रुग्णांची भर

  – जिल्ह्यातील रिकव्हरी रेट पोहोचला 81.12 टक्क्यांवर

  – जिल्हयात 24 तासांत 76 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

  – जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या 72 हजार

 • 04 May 2021 07:04 AM (IST)

  रायगड जिल्ह्यात फक्त पनवेल तालुका आणि महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयात रेमडेसीव्हीरचे वाटप

  रायगड –

  आज रायगड जिल्ह्यात फक्त पनवेल तालुका आणि महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयात रेमडेसीव्हीरचे वाटप

  आज जिल्ह्यातील पनवेल विभागातील 42 खाजगी रुग्णावयात 372 रेमिडीसिवीर चे वाटप.

  आज सलग तिस-या दिवशी जिल्ह्यात रेमिडीसिवीरचा तुटवडा.

  29 एप्रिल रोजी रेमीडीसिवीर ची निक्रुष्ट दर्जाची बँच आल्यामुळे 510 रेमिडीसिवीर माघारी घेण्यात आले होते.

  त्या नतंर सलग तीन दिवस रेमीडिसिवर आलेच नाही रायगड जिल्ह्यात.

  आज केवळ 15 तालुक्यापैकी केवळ पनवेल विभागात वाटप झाल्याने ईतर 14 तालुक्यातील खाजगी रुग्णांलयातील रुग्ण हवालदील.

 • 04 May 2021 07:03 AM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या 24 तासांत नवीन 814 रुग्ण

  उस्मानाबाद कोरोना अपडेट

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या 24 तासांत नवीन 814 रुग्ण आणि 13 मृत्यू तर 778 जणांना डिस्चार्ज

  उस्मानाबाद तालुक 293, तुळजापूर 54,उमरगा 84, लोहारा 62, कळंब 118, वाशी 56, भूम 75 व परंडा 72 रुग्ण

 • 04 May 2021 07:02 AM (IST)

  पुण्यात मंगळवारीही कोरोना लसीकरण बंद राहणार

  – पुण्यात मंगळवारीही कोरोना लसीकरण बंद राहणार,

  – लस न आल्याने पुणे महापालिकेचा निर्णय,

  – पुण्यातील लसीकरण बंद असण्याचा उद्या चौथा दिवस.

 • 04 May 2021 07:00 AM (IST)

  सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 1568 कोरोना रुग्ण

  सांगली कोरोना अपडेट –

  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत दिवसभरात 1568 कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 40 रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यूचा आकडा 2388 वर

  अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13861 वर

  तर उपचार घेणारे 1262 जण आज कोरोना मुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 63662 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 79911 वर

 • 04 May 2021 06:58 AM (IST)

  ठाण्यात गेल्या 24 तासांत 516 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  ठाणे कोरोना अपडेट :

   1,121 रुग्ण कोरोनातून झाले बरे

  आज 516 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 1,20,925 इतकी आहे

  आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 1,11,054 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 91.8% इतकं आहे )

  8,155 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत

  आज 9 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 1,716 जणांचा मृत्यू झाला

  मागील 24 तासात एकूण 4,070 जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 516 ( 12.68%) कोरोना बाधित झाले आहेत