रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी अपडेट, थेट पीएनेच..

भाजपाच्या मंत्री आणि महिला नेत्या रक्षा खडसे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह भाषा करणारे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले. धक्कादायक म्हणजे भाजपाचे नेते विजय चाैधरी आणि मंत्री गिरीश महाजन हेच या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत होते. या प्रकरणात आता पहिली कायदेशीर कारवाई करण्यात आली.

रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी अपडेट, थेट पीएनेच..
Girish Mahajan Raksha Khadse Vijay Chaudhary
| Updated on: Aug 01, 2026 | 8:01 AM

भाजप नेते विजय चौधरी यांच्या अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी यांची एक ऑडिओ क्लिप तूफान व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. एकनाथ खडसे, त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलण्यात आले. हेच नाही तर अनेकदा विजय चाैधरी हे शिवीगाळ करतानाही ऑडिओ क्लिपमध्ये दिसले. आपल्याच पक्षातील एका महिला नेत्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली जात होती, पण गिरीश महाजन यांनी विजय चाैधरी यांना अजिबात रोखले नाही. या व्हायरल ऑडिओ क्लिपने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. यादरम्यानच विजय चाैधरी यांच्या अजून काही ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहेत. भागवत कराड आणि विजय चाैधरी यांंचीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यात मंत्री पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत भाष्य करण्यात आले.

विजय चाैधरी यांच्या अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या प्रकरणात पहिली मोठी कारवाई झाली. भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली.  विजय चौधरी यांच्या स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले.

विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने चौधरी यांच्या मुलाने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधून स्वीय सहाय्यक यश टिपरे यांनी एका पेन ड्राईव्ह मोबाईलमधील डेटा घेतला होता. संशयित यश टिपरे याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिप आणखी कुणाकुणाला पाठविण्यात आल्या आहेत. याचा पोलिसांचा तपास सुरू आहे. क्लिप व्हायरल करण्यामागील साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून चाैकशी केली जातंय. ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा नंदुरबार पोलिसांनी इशारा दिला. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. आणखी काही जण रडारवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us