आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकून पोलीस काँस्टेबल बेपत्ता

सोलापूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्या करण्याच्या पोस्टमुळे सोलापुरात एकच खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्रास देत असल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी पोस्ट टाकून हा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. सोलापूर पोलीस आणि नातेवाईक या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत. बक्कल नंबर 1093 पोलीस कर्मचारी राहुल जगताप हे सोलापूरच्या पंढरपूर तालूका पोलीस ठाण्यात काँस्टेबल …

आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकून पोलीस काँस्टेबल बेपत्ता

सोलापूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्या करण्याच्या पोस्टमुळे सोलापुरात एकच खळबळ माजली आहे. वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्रास देत असल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी पोस्ट टाकून हा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. सोलापूर पोलीस आणि नातेवाईक या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.

बक्कल नंबर 1093 पोलीस कर्मचारी राहुल जगताप हे सोलापूरच्या पंढरपूर तालूका पोलीस ठाण्यात काँस्टेबल पदावर कार्यरत आहेत. राहुलने त्यांच्या ठाण्यातील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि काँस्टेबल आरकीले हे संगनमत करुन खोट्या डायरी आणि ड्यूटीचा त्रास देतात. म्हणून मी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट व्हॉट्सअपवर टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोलापुरात जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ माजली. त्यांनंतर राहुलचा शोध घेण्यात आला, मात्र तो अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्याचा फोनही बंद आहे.

राहुल यांच्या अशा प्रकारे बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच पीआय धनंजय जाधव आणि काँस्टेबल आरकीले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राहुलच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करु अशी माहिती डीवाय एसपी डॉ. सागर कवडे यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *