ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा तोडला

ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा थकीत वीजबिलापायी खंडित केला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे आणि पाणीपुरवठा बंद आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा तोडला
नाशिकमध्ये अखिल भारतीय सरपंच परिषदेने आंदोलन करून महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 5:23 PM

नाशिकः ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा थकीत वीजबिलापायी खंडित केला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे आणि पाणीपुरवठा बंद आहे. याचा निषेध म्हणून सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील ग्रामपंचायतीची करवसुली कोरोनामुळे संथ झाली आहे. ग्रामपंचायतीच काय महापालिकांवर आर्थिक अरिष्ठ कोसळले आहे. त्यात राज्यभरातल्या अनेक ग्रामपंचायतींचे वीजबिल थकले आहे. आता महावितरणने या बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पथदिवे बंद असल्याने गावात अंधार आहे. पाणीपुरवठ्याची वीज खंडित केल्याने गावात पाणी नाही. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे सुरू असल्याने याचा निषेध करत अखिल भारतीय सरपंच परिषदेने बिटको चौकातील विद्युत भवन येथील महावितरणच्या मुख्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आत कोंडले गेले. खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडले, गर्दी जमवून कोरोना विषाणू प्रादुर्भावास हातभार लावला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक झाली असून, महावितरणने लवकरात लवकर गावांचा वीजपुरवठा सुरू करा. त्यांची दिवाळी आनंदात जावू द्यावी. त्यानंतर थकबाकी वसुली मोहीम राबवावी. अन्यथा यापुढचे आंदोलन जास्त आक्रमक पद्धतीने करू असा इशारा दिला आहे.

अनेक गावे अंधारात

महावितरणने थकीत वीजबिलासाठी वीजपुरवठा केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. त्यांचा दिवाळी सण अंधारात जाण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

बुलडाण्यात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महावितरणच्या महिला कर्मचारी अर्चना काटे आणि इतर सहकारी या थकीत विद्युत बिल भरणा वसुलीसाठी गेले असता त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडलीय. याप्रकरणी मेहकर पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर बातम्याः

कृषिमंत्र्यांच्या मतदार संघातील अनुदान वाटपात घोळ; चौकशी समितीचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न, ठपका ठेवलेल्या दोषींवर कारवाईस टाळाटाळ

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरण; पुनमियाला चार आठवड्यांचा दिलासा, अटक टाळण्यासाठी धडपड

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू; दिवाळीपूर्वी पगार करण्यासह अनेक मागण्यांसाठी उपसले आंदोलनाचे हत्यार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.