प्रफुल पटेल तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी? महाराष्ट्राला सांगा, रोहित पवार यांचे आवाहन

अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधानानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या अपघातावर अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रफुल पटेल तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी? महाराष्ट्राला सांगा, रोहित पवार यांचे आवाहन
rohit pawar and praful patel
| Updated on: Mar 08, 2026 | 5:56 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या अपघातावरुन अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या संदर्भात अजितदादाचे पुतणे रोहित पवार यांनी सतत पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हीआरएस विमान कंपनीच्या कारभारावर अनेक शंका रोहित पवार उपस्थित करत आहेत. या अपघाताची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी करावी अशीही मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना काही प्रश्न विचारले आहेत.

मुंबईवरुन बारामतीला येत असताना राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या खाजगी चार्टर विमानाला अपघात झाला आणि त्यात अजितदादांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर या अपघातात विमानात काही तरी बिघाड झाला असावा असे संशय व्यक्त केले गेले. त्यानंतर अजितदादा यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक जाहीर सवाल करीत व्हीआरएस विमान कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. आता या अपघातानंतर या विमानकंपनीचे सेफ्टी ऑडीट करीत डीजीसीएने काही जातीच्या विमानांचा मेन्टेनन्स योग्य प्रकारे होत नसल्याचे पुढे आल्याने या मॉडेलच्या विमानांच्या उड्डाणांवर नुकतिच बंदी घातली आहे.

Loading...

येथे पोस्ट पाहा –

अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत त्यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. आता रोहित पवार यांनी या संदर्भात आता सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ते या पोस्टमध्ये म्हणतात की Mr. प्रफुल पटेल जी ( माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री ) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण- कोण नेते आले होते आणि ते कुठल्या पक्षाचे होते? हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावे. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या पोस्टमुळे रोहित सिंग यांच्या विवाहास नेमके कोणत्या पक्षाचे नेते उपस्थित राहिले होते याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us