गेस्टहाऊसमध्ये दिवसाढवळ्या सुरु होती देहविक्री, १५ महिलांसह मॅनेजर-कर्मचाऱ्यांवर कारवाई

या गेस्ट हाऊसमधील अनैतिक व्यवसायामुळे स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी भरदुपारी पोलिसांच्या बंदोबस्तात या गेस्टहाऊसवर कारवाई करण्यात आली.

गेस्टहाऊसमध्ये दिवसाढवळ्या सुरु होती देहविक्री, १५ महिलांसह मॅनेजर-कर्मचाऱ्यांवर कारवाई
Prostitution racket
| Edited By: | Updated on: Oct 22, 2026 | 10:18 PM

कल्याण स्थानक परिसरातील एका गेस्ट हाऊसवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून देहविक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या गेस्टहाऊसमध्ये दिवसाढवळ्या खुलेआम शरीर विक्रय सुरु होता. त्या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या गेस्टहाऊसवर पोलिसांनी धाड टाकून १५ महिला आणि लॉजच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना कारवाई केली आहे.

कल्याण स्थानक परिसरात दिवसाढवळ्या देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. या संदर्भात नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी कल्याणच्या झुंझाराव मार्केटमधील अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमध्ये अचानक धाड टाकली. या प्रकरणात या गेस्ट हाऊसच्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांसह १५ महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे.

Loading...

कल्याण स्टेशन परिसरातील या अन्नपूर्णा गेस्ट हाऊसवर गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकला, तेव्हा तेथे दिवसाढवळ्या देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांना आढळले. गेस्ट हाऊसमधील अनैतिक व्यवसायामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी येथे कारवाई करीत मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात १५ महिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने येथे अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबत असतात. रेल्वे स्थानक परिसरात गेस्ट हाऊस असल्यामुळे कोणाला त्यात असे प्रकार सुरु असतील असे वाटत नव्हते. मात्र, अशा प्रकारे गेस्टहाऊसच्या नावा खाली येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us