Pune : …तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर

Pune Illegal Abortion Racket : दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाने सगळीकडे खळबळ उडाली आहे. हे रॅकेट नेमकं कसं चालायचं ते जाणून घेऊयात.

Pune : ...तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर
Pune illegal abortion case
Image Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 9:11 PM

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. कायद्याने बंदी असतानाही अजूनही मुलगा-मुलगी भेदाच्या मानसिकतेतून काही जण गर्भलिंग निदानाचा काळाबाजार चालवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हे गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुप्तपणे गर्भलिंग निदान…

आईच्या उदरात वाढणाऱ्या जीवाचं भविष्य ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण पैशाच्या हव्यासापोटी आणि विकृत मानसिकतेतून अजूनही गर्भलिंग निदानासारखा घृणास्पद प्रकार सुरू असल्याचं केडगावमधील या प्रकरणातून समोर आलं आहे. ड तालुक्यातील केडगाव परिसरात गुप्तपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती वायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी आणि आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली असून गुन्हे दाखल करत आरोपीला अटक केलं आहे.

चाचणी केल्यानंतर गर्भपात

हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून त्यामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गर्भवती महिलांना गुप्तपणे गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात केला जात असे. साखळीमध्ये एजंट, काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि नगर जिल्ह्यातील एका राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याची माहिती समोर येत आहे. गर्भलिंग निदान प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तींना या संदर्भातली माहिती आहे त्यांनी पोलीस प्रशासन तथा दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये संपर्क साधावा असं वैद्यकीय अधिकारी आवाहन करत आहेत.

नागरिक संतप्त

कायद्याने गर्भलिंग निदानावर स्पष्ट बंदी आहे. तरीही समाजातील काही विकृत प्रवृत्ती अजूनही मुलीला जन्मापूर्वीच संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे अशा घटनांमुळे समाजातील कटू वास्तव समोर येत आहे. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त करत आहेत मात्र आरोपीच्या दहशतीमुळे माध्यमांसमोर येऊन बोलण्यास टाळत आहेत.

सखोल तपासाला सुरुवात

केडगावमध्ये उघडकीस आलेलं हे प्रकरण केवळ एका गावापुरतं मर्यादित नसून समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. आईच्या गर्भातील मुलींचा जीव पैशासाठी धोक्यात घालणाऱ्या या रॅकेटचा नेमका विस्तार किती आहे, याचा तपास आता सुरू आहे. मात्र या प्रकरणातून एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकविसाव्या शतकातही मुलगी जन्माला येणं काही जणांना का खटकतंय ? गर्भातील जीवाचा सौदा करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Follow Us