AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भलिंग चाचणीनंतर गर्भपात… बड्या रॅकेटचा भांडाफोड, पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर

Pune Illegal Abortion Case : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी करून नंतर गर्भपात केला जात असल्याचे समोर आले आहे.

गर्भलिंग चाचणीनंतर गर्भपात... बड्या रॅकेटचा भांडाफोड, पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर
Pune Illegal Abortion Case Image Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 5:06 PM
Share

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका बोगस डॉक्टरकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून घरामध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. गर्भलिंग तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये आकारले जात होते. या प्रकरणी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केला असता यात अनेकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

सात ते आठ डॉक्टर आरोपीच्या संपर्कात

वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गुजर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. याबाबत बोलताना गुजर यांनी म्हटले होते की, गर्भलिंग निदान करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओच्या आधारे यवत पोलीस स्टेशन एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरच्या आधारे यवत पोलीस स्टेशनने दोन आरोपींना अटक केली आहे. या अटकेनंतर लक्षात आले की गर्भलिंग निदानाचे जाळे दौंड तालुक्यात पसरलेला आहे. या प्रकरणात सात ते आठ डॉक्टर संबंधित आरोपीच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

घरी जाऊन सोनोग्राफी करायचा

पुढे बोलताना गुजर यांनी सांगितले की, आमच्याकडे 30 सोनोग्राफी सेंटर रजिस्टर आहेत. सिस्टीमच्या बाहेर राहून हा संबंधित व्यक्ती काळे कारणामे करायचा. त्यामुळे त्याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. संबंधित व्यक्ती एजंटला हाताशी धरून तो डायरेक्ट त्या महिलेच्या घरी जायचा आणि सोनोग्राफी करायचा. तो सिस्टीम मध्ये कुठेच राहिला नाही. तो व्हिडिओ आमच्या हाती आला आणि आम्ही एफआयआर दाखल केली. दौंड आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना नम्र विनंती आहे या गुन्ह्याच्या संदर्भात आपल्या कडे काही माहिती असल्यास पोलीस स्टेशन किंवा दौंड उपजिल्हा रुग्णालय इथे संपर्क साधून ती माहिती द्यावी.

मुख्य आरोपीला अटक

या प्रकरणावर बोलताना यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी केडगाव येथे गर्भलिंग निदान होत असलेला व्हिडिओ वायरल झाला. दौंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गुजर यांनी तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा दाखल धाला. यामध्ये अण्णासाहेब गिरी हा व्यक्ती गर्भलिंग निदान पोर्टेबल मशीन द्वारे करत असलेला तपासात निष्पन्न झाला आहे त्याला अटक करण्यात आली आहे. या तपासामध्ये त्याने ही मशीन नरेंद्र ठाकरे इसमाने कडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

500 महिलांचा गर्भपात

ही मशीन जप्त करण्यात आली आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर तो संबंधित डॉक्टरांकडे त्या महिलेला पाठवून गर्भपात करून घेत होता. या अनुषंगाने तपासामध्ये डॉ अतुल जाधवचा रोल तपासात निष्पन्न झाला आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे. आणखी दोन डॉक्टर दोषी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ते फरार आहेत. दोन वर्षात 500 गर्भपात झाले असं काही रेकॉर्डमध्ये आहे. याचा तपास सुरू आहे. अण्णासाहेब गिरी हा कुठलीही वैद्यकीय पदवी न घेतलेला बोगस डॉक्टर आहे. तो गर्भलिंग निदान करायचा. त्याच्याकडे रुग्ण हे संपर्कातून यायचे. मुलीचा गर्भ निष्पन्न करून ते गर्भपात करायचे. संबंधित महिला आणि तिचे नातेवाईक ही माहिती गुप्त ठेवायचे त्यामुळे तपासात मोठं आव्हान आहे.

Follow Us
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी