Bullock Cart Race | पुण्यात बैलांना निर्दयी वागणूक, बैलगाडा शर्यतीवर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

| Updated on: Jan 02, 2022 | 9:03 AM

भोरमधील केंजळ गावाच्या हद्दीतही बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. या शर्यतीमध्ये बैलांना निर्दयी वागणूक दिल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर शर्यतीत सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांनी तिथून पळ काढला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

Bullock Cart Race | पुण्यात बैलांना निर्दयी वागणूक, बैलगाडा शर्यतीवर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल
bullock cart
Follow us on

पुणे : मागील काही दिवसांपासून बैलडागा शर्यतीवरून मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय. कोरोना संसर्गामुळे बैलगाडा शर्यतीला मनाई केली जात असताना ठिकठिकाणी नियम झुगारुन या शर्यतींचे आयोजन केले जात आहे. भोरमधील केंजळ गावाच्या हद्दीतही बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. या शर्यतीमध्ये बैलांना निर्दयी वागणूक दिल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर शर्यतीत सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांनी तिथून पळ काढला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

शर्यतीमध्ये बैलांचा छळ, गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याती भोरमधील केंजळ गावाच्या परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत बैलगाडा मालाकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. मात्र, शर्यतीदरम्यान बैलांचा मोठा छळ करण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी बैलगाडा शर्यतीत सामील झालेल्या बैलगाडा मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत भगत,आकाश भगत,सोनू पठारे,गणेश भोसले,संजय पोकळे आणि शर्यतीत सहभागी बैलगाडा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

बैलगाडा शर्यतीला परवानगी का नाही ?

तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळत नसल्यामुळे पुण्यात वातावरण चांगलेच तापले आहे. एक जानेवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीतल्या बैलगाडा शर्यतीला अचानक स्थगिती देण्यात आली होती. त्याचा बैलगाडा मालकांनी निषेध केला होता. तसेच बैलगाडा मालकांनी एकीकडे भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाते मग बैलगाडा शर्यतीला का नाही ? असा सवाल सरकारला केला होता. शर्यतीला अचानक स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा मालकांनी नाराजी व्यक्त केली होती.

बैलगााड शर्यतींमध्ये राकारण, मुख्यमंत्र्यांशी बोलणार 

लांडेवाडीतील बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यानंतर शर्यतीच्या घाटावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच नागरिकांनी घाटावर येऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात होतं. या सर्व प्रकाराची दखल माजी खासदार शिवाजीरा आढळराव पाटील यांनी घेतली होती. त्यांनी बैलगाडा शर्यतीला स्थगिती देण्यामागे राजकारण झालंय. कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असल्यामुळे शर्यतीला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. एकीकडे भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते मग शर्यतीला का नाही? असे शिवाजीराव म्हणाले होते.

इतर बातम्या :

कोहलीचे दिवस फिरलेलेच ! क्रिकेटच्या देवानेही त्याला बेस्ट टीममधून वगळलं, धोनीचं काय झालं?

Mumbai Bank Election | मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त

अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक