Mumbai Bank Election | मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान होणार असून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. उरलेल्या चार जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

Mumbai Bank Election | मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त
mumbai bank
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:24 AM

हिरा ढाकणे, टीव्ही९ मराठी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा अध्याय संपतो ना संपतो तोच आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची सुरु झाली आहे.  मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागासांठी आज मतदान होणार असून एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. उरलेल्या चार जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.

10 हजार 191 मतदार करणार मतदान 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक होत आहे. चार जागांसाठी एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या आठही उमदेवारांमध्ये अटीतटीची लढाई होणार असल्याचे सांगण्यात येतंय. या निवडणुकीसाठी एकूण 10 हजार 191 मतदार मतदान करणार असून रविवार म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. निवडणूक प्राधिकरणाने मतदानासाठी शीव येथील साधना पूर्व प्राथमिक विद्यालय आणि डी. एस. हायस्कूलची निवड केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले यांनी वरील माहिती दिली असून मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनन पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात चोख पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोण सरस, कोणाच्या पदरी अपयश ?

मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खटाटोप करण्यात येत होता. यामध्ये काही प्रमाणात यश मिळाले. एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर उमेदवारांची बिनिरोध निवड करण्यात आली. तर चार जागांवर एकमत न झाल्यामुळे येथे निवडणूक होत आहे. यावेळी कोणाचा गट सरस ठरणार आणि कोणाच्या पदरात अपयश पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासूनन मुंबई बँकेच्या संचालकपदी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आहेत.

इतर बातम्या :

कोहलीचे दिवस फिरलेलेच ! क्रिकेटच्या देवानेही त्याला बेस्ट टीममधून वगळलं, धोनीचं काय झालं?

Paush Amavasya 2022 | आज वर्षातील पहिली अमावस्या, जाणून घ्या महत्त्व, पूजेची पद्धत, शुभ वेळ

Zodiac| ‘विश्वासू’ हीच यांची ओळख , या 5 राशीच्या लोकांवर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.