अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक

अल्पवयीन मुलीला मिठी मारुन शाळेच्या पटांगणात चुंबन, मुरुडमध्ये टवाळखोराला अटक
रेवदंडा पोलीस स्टेशन

शाळेच्या पटांगणात येऊन त्याने तिचा हात पकडला आणि मिठी मारुन चुंबन घेतल्याचा आरोप आहे. तू माझ्यासोबत ये, तुला पैसे देतो, असं बोलून आरोपीने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 02, 2022 | 7:36 AM

रायगड : 15 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रायगडमधील मुरूड तालुक्यातील एका शाळेच्या पटांगणात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी आरोपीला 31 डिसेंबरच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

15 वर्षीय पीडित मुलगी शाळेत जात होती. मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असतानाही आरोपी तिचा पाठलाग करत होता. संबंधित शाळेच्या पटांगणात येऊन त्याने तिचा हात पकडला आणि मिठी मारुन चुंबन घेतल्याचा आरोप आहे. तू माझ्यासोबत ये, तुला पैसे देतो, असं बोलून आरोपीने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.

आरोपीला अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा

याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु. र. नं.134/2021 भा. दं. वि. क. 354 , 354 A (i),(ii),354 D, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 7, 11 (1), 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद चिमडा हे करत आहेत.

संबंधित बातम्या :

दारुचे आमिष दाखवून केली विद्यार्थ्याची हत्या; गाझियाबादमधील धक्कादायक घटना

बहिणीचे लग्न मोडण्यासाठी इन्स्टाग्रामवर उघडले नवरदेवाचे बनावट अकाऊंट; गुन्ह्याचा हेतू ऐकून पोलिसही चक्रावले

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीची हत्या; दोन मित्रांच्या मदतीने प्रियकराने रचला कट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें