AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाचा ‘धडा’!

अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाने 'धडा' शिकवला आहे.

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाचा 'धडा'!
| Updated on: Dec 11, 2020 | 10:22 AM
Share

पुणे : अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठेला पुणे विद्यापीठाने ‘धडा’ शिकवला आहे. बाळ बोठेचे राजकीय पत्रकारितेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे. (Pune University decides to remove Bal Bothe book from the syllabus)

पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला होता. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. आता हेच पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

बाळासाहेब बोठेच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचा एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले गेले होते. मात्र रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणात बोठेचे नाव पुढे आल्यानंतर पुणे विद्यापीठाने बोठेला मोठा धडा शिकवलाय.

बाळासाहेब बोठे याची आतापर्यंत तब्बल 14 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बाळासाहेब बोठे याच्या या पुस्तकांपैकी 6 पुस्तकांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुद्दे आणि गुद्दे, पक्ष आणि निष्पक्ष, कानोकानी-पानोपानी आणि नेतृत्व मीमांसा ही 4 पुस्तकं पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवडण्यात आली आहेत.

बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.

(Pune University decides to remove Bal Bothe book from the syllabus)

संबंधित बातम्या

Rekha Jare Murder | वादातून नाही, तर सुपारी देऊन हत्या, नगरच्या रेखा जरे हत्याकांडातील पत्रकार कोण?

रेखा जरे हत्या प्रकरणात ‘एक’ फोटो ठरला निर्णायक; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्येचा उलगडा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.