AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंहगडावर दोन मुली वाचवा, वाचवा म्हणून ओरडत होत्या, सर्वजण स्वतःचा जीव वाचवून पळत होते कारण…

दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या. परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते.

सिंहगडावर दोन मुली वाचवा, वाचवा म्हणून ओरडत होत्या, सर्वजण स्वतःचा जीव वाचवून पळत होते कारण...
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 18, 2023 | 9:18 PM
Share

विनय जगताप, प्रतिनिधी, पुणे : रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. वाहनतळ पूर्ण भरून घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गाडी तळापासून पुणे दरवाजापर्यंत आणि गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालत होते. तेवढ्यात टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत होत्या. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी घेतली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला. यात सुमारे ५९ पर्यटक जखमी झाले. त्यामुळं पर्यटकांनी नाराजी व्यक्त केलीय.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नाही.

जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन सिंहगडावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे.

दोन मुलींच्या शरीरावर चिपकल्या मधमाशा

दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या. परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते. हॉटेल चालकांनी धूर करुन मधमाशांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलींपासून धूर लांब असल्याने उपयोग होत नव्हता. असं पर्यटक अजित निमसे यांनी सांगितलं.

मधमाशा दिसल्याने पर्यटक पळाले

अचानक मधमाशा दिसल्याने आम्ही पळालो. हजारो पर्यटक गडावर होते. जर मोठ्या प्रमाणात मधमाशांनी हल्ला केला तर लोक पळणार तरी कोठे? संबंधितांनी याबाबत काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं पर्यटक ईश्वर खरात यांनी म्हटलं.

सकाळी काही तरुणांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यानंतर त्या परिसरात कोणी जाऊ नये म्हणून कर्मचारी तैनात केले होते. असे असताना पुन्हा त्या परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. तोफेचा पॉईंट परिसरात कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत. असं सिंहगडचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सांगितले.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...