Bhor : भोरमध्ये भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट व उपप्रकार आले उजेडात; पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता

| Updated on: Jun 07, 2022 | 12:58 PM

कार्ले, भाजे, बेडसे, मारुंजी, कापूरहोळनंतर आता भोर मधील डोंगर भागातही पटखेळ आढळल्याने हा प्राचीन काळातील व्यापारी मार्ग होता का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या बाबत अधिक सखोल संशोधन आणि या खेळांचे जतन करण्याची आवश्यकता इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलीय.

Bhor : भोरमध्ये भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट व उपप्रकार आले उजेडात; पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता
भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट
Follow us on

पुणे – जिल्ह्यातील भोरमध्ये भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे(Ancient game) 21 पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आलेतं.यामुळं पुरातत्त्वशास्त्र (Archeology)अभ्यासकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झालीय, प्राचीन खेळांच्या अभ्यासासाठी अभ्यासक भोरमधील भोरदरा डोंगर परिसरात येऊ लागलेयत या आधी पुणे जिल्ह्यात अश्याच प्रकारचे पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 35 पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले आहेत. नाशिकचे अभ्यासक सोज्वळ साळी यांना हे खडकांवरील पटखेळ सापडले आहेत. प्राचीन काळात खडकांवर मनोरंजनासाठी (Entertainment) पटखेळ कोरले गेले आहेत. आतापर्यंत पाताळेश्वर, भाजे, सिंहगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर येथे काही पटखेळ सापडले आहेत.

शासनाने यात लक्ष घालण्याची आवश्यकता

.पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त अश्या प्रकारचे खेळ आढळत असल्यानं, शासनाने यात लक्ष घालून खेळांचे जतन करण्याची आवश्यकता असल्याचं मतं अभ्यासकांनी व्यक्त केलंय. वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यास करत असलेल्या सोज्वल साळी यांना मारुंजी येथील टेकडीवर 41 पटखेळांचा शोध लागला होता. त्यानंतर कापूरहोळ गावातून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गावरील खडकांवर मंकला या खेळाचे 35 पट आणि त्यात वेगवेगळय़ा उपप्रकारांच्या पटांचा शोध लागला आहे. तसेच या ठिकाणच्या खडकांवर पटखेळांसह अन्य आकृत्या, चिन्हे असल्याचे दिसून येत आहे.

अभ्यासक काय म्हणतायत

भोर येथे सापडलेल्या पटखेळांविषयी अभ्यासक साळी म्हणाले, की प्राचीन पटखेळ संवर्धन मोहीम अंतर्गत पुण्यातील भोर तालुक्यात भोरदरा येथील परिसरात राजेश महांगरे यांना मिळालेल्या खेळांची 04 जून 2022 रोजी दस्तऐवजीकरण व नोंदणी करण्यात आलीयं. त्यावेळी मंकला खेळ प्रकारातील अनवोली, अदादा हे दोन प्रकारचे खेळ जे आफ्रिकेतील इथिओपिया या खेळाच्या प्रकाराप्रमाणे खेळांचे अवशेष मिळाले आहेतं. या ठिकाणी 4 फूट लांब आणि 4 फूट रुंद खेळ मिळालायं. त्यामुळे एक अभ्यासासाठी संशोधनाचा विषय निर्माण झाला आहे. यावेळी नोंदणी करण्यासाठी प्राचीन खेळांचे तज्ञ तथा पुरातत्व शास्त्रज्ञ सोज्वळ साळी यांच्या सोबत प्राचीन खेळ अभ्यासक विवेक दाणी, महेश शिरसाठ, संकेत मोरे उपस्थित होते काही दिवसांपूर्वी कापूरहोळ येथे सापडलेल्या सर्व खेळांचेसुद्धा दस्तावेजीकरण करण्यात आलयं. त्यात मंकला या मुख्य खेळाचे उपप्रकार असल्याचे दिसून आले. मंकलाचा एक उपप्रकार केनियामध्ये अजुआ या नावाने खेळला जात होता. तर, अळीगुळीमाने हा खेळ आजही भारतातील कन्नड भागात खेळला जातो. कापूरहोळ येथील खडकांवर वेगवेगळी चिन्हे, आकृत्याही आहेत. त्यामुळे त्यांचाही अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आहे. खडकांवर खड्डे असलेल्या मंकला या खेळाचे विविध प्रकार जगभरातील विविध देशांमध्ये खेळले जात असल्याचे पुरावे मिळतात. त्याबाबत आतापर्यंत संशोधनेही झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

 व्यापारी मार्ग होता का?

कार्ले, भाजे, बेडसे, मारुंजी, कापूरहोळनंतर आता भोर मधील डोंगर भागातही पटखेळ आढळल्याने हा प्राचीन काळातील व्यापारी मार्ग होता का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या बाबत अधिक सखोल संशोधन आणि या खेळांचे जतन करण्याची आवश्यकता इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलीय. त्या दृष्टीने अभ्यासही सुरू करण्यात आलायं.या शोध मोहिमेमध्ये इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांचा सहभाग अधिक उपयुक्त ठरेल, असही मतं भोर येथे आलेल्या पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केलंय.

शासनाने लक्ष देण्याची गरज

पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त अश्या प्रकारचे खेळ आढळत असल्यानं, शासनाने यात लक्ष घालून खेळांचे जतन करण्याची आवश्यकता असल्याचं मत सोज्वळ साळी या नाशिकच्या पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केलंय.भोरचे इतिहास अभ्यासक राजेंद्र महांगरे आणि संकेत मोरे यांनी हे खेळाचे अवशेष या भागात असल्याचं उजेडात आणलं, त्यानंतर पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक सोज्वळ साळी, विवेक दाणी,महेश शिरसाठ या अभ्यासकांनी भोर येथे येऊन या खेळांवर अभ्यासाला सुरुवात केलीय.