AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune PMC | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील अनाधिकृत बांधकामावरही बसणार हातोडा

बांधकाम अधिकृत करत असताना 2020 पूर्वीचे असल्याचे गुगल मॅप पिक्‍चर जोडावे लागत होते. त्यामुळे अनेकांची गोची झाली. गुगल मॅपवरील तारीख व बांधकामाची तारीख यामध्ये तफावत आढळून आली. अनेकांनी महापालिका व पीएमआरडीएचे सर्व नियम धाब्यावर बसवून अरुंद जागेत इमारती उभ्या केल्या आहेत.

Pune PMC | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील अनाधिकृत बांधकामावरही बसणार हातोडा
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: Tv9
| Updated on: Apr 01, 2022 | 4:11 PM
Share

पुणे – महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम (Encroachment Removal Campaign)चांगलीच सुरु ठेवली आहे. शहरातल्या वेगवेगळ्या भागातील अतिक्रमण  काढले आहे. नागरिकांच्या विरोधाला न झुगारताही क कारवाई केली जात आहे. याबरोबरच आता पुण्यात (Pune)नव्याने समाविष्ट झालेल्या34  गावातील (Villages )अतिक्रमणावरही कारवाई करत ती काढून टाकणार आहेत. या गावांचा महानगरपालिकेत समावेश होणार असल्याचे समजताच अनेकांनी घाईगरबडीत बांधकामे केली आहेत. मात्र महापालिके केवळ 31 डिसेंबर2020 पूर्वी झालेली बांधकामेच अधिकृत धरणार आहे. याबरोबरच नागरिकांना 31 मार्च पूर्वी अनधिकृत बांधकामे ऑनलाइन अर्ज करत अधिकृत करता येणार होती. मात्र ती मुदतही संपली आहे.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले

महानगरपालिकेतील समाविष्ट गावात अनेकांनी बेकायदेशीर रित्या बांधकाम केली. मात्र जेव्हा ही अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची वेळ आली तेव्हा बांधकाम व्यासायिकांना घाम फुटलेला दिसून आला. बांधकाम अधिकृत करत असताना 2020 पूर्वीचे असल्याचे गुगल मॅप पिक्‍चर जोडावे लागत होते. त्यामुळे अनेकांची गोची झाली. गुगल मॅपवरील तारीख व बांधकामाची तारीख यामध्ये तफावत आढळून आली. अनेकांनी महापालिका व पीएमआरडीएचे सर्व नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक जलप्रवाह अडवून, उंच टेकडीवर, ओढ्यांमध्ये, अरुंद जागेत इमारती उभ्या केल्या आहेत. रेरा नुसार कोणत्याही नियमांची अंमलबाजवणी केलेली नाही. अनेक गावातील रस्त्यावरही अतिक्रमणही करण्यातआले आहे. ही सर्व अतिक्रमण महानगरपालिकेकडून काढून टाकण्यात येणार आहे.

सरकारी जागेत बांधकाम

अनेक गावात गायरान, सरकारी मालकीच्या जागा वने अशा ठिकाणीही बांधकाम करण्यात आहे. झोपडपट्ट्याही उभारण्यात आल्या आहेत. यासगळ्या बांधकामावर महानगरपालिका लवकरच कारवाईचा बडगा उगारणार आहे.

Video : उत्तरप्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले – प्रकाश आंबेडकर

IPL 2022 GT vs DC Live Streaming: गुजरात टायटन्स वि दिल्ली कॅपिटल्स LIVE मॅच तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता?

Video Nagpur school | शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे; उद्या सुटी असल्याने आजच उभारली गुढी

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.