PMC Encroachment action | पुणे महापालिका प्रशासन अर्लट मोडवर ; आज पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमांच्या कारवाईची सुरुवात

कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार .    कारवाईसाठी सुमारे पंचवीस जेसीबी, दीडशे अधिकारी व कर्मचारी, 100 पोलीस यांच्यासह दंगल पथक घटनास्थळी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.

PMC Encroachment action | पुणे महापालिका प्रशासन अर्लट मोडवर ; आज  पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमांच्या कारवाईची  सुरुवात
महापालिकेची पोलिसांच्या ताफ्यासह अतिक्रमांची कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 5:07 PM

पुणे- शहारत प्रशासनाचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून अतिक्रमणाच्या कारवाईला (Encroachment action)चांगलाच वेग आला आहे. अनेक ठिकाणी पोलिकेने बुलडोझर फिरवायला सुरू केले आहे. यात स्थानिकांचा निवारा, दुकानं अनेक गोष्टी हिरावल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिकही चांगलेच आक्रमक होत आहेत. काल(मंगळवारी) शहरातील धानोरी परिसरात झालेल्या अतिक्रमणावरील कारवाई करत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर(Municipal employee) स्थानिक नागरिकांनी हल्ला केला. या घटनेनंतर आज महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या संपूर्ण स्टाफ सह आकाशचिन्ह परवाना व बांधकाम विभाग तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालतील ( Yerawada Regional Office)सर्व अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

पूर्ण अतिक्रमणावर काढणार

निरीक्षक व चालक यांना कारवाईदरम्यान झालेल्या हल्ल्याचा काळया फिती लावून निषेध नोंदवत बुधवारी सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. कोणत्याही विरोधाला न जुमानता महापालिका प्रशासन संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढणार .    कारवाईसाठी सुमारे पंचवीस जेसीबी, दीडशे अधिकारी व कर्मचारी, 100 पोलीस यांच्यासह दंगल पथक घटनास्थळी कारवाईसाठी तैनात करण्यात आलेले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना झाली मारहाण

शहरातील धानोरी येथे काल (मंगळवारी) अतिक्रमण कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. कारवाई साठी गेल्यानंतर ही घटना घडली होती. अतिक्रमण काढण्यास विरोधात करत स्थानिक नागरिकांनी काल कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर हल्ला केला. यात महापालिकेचा कर्मचारी जखमी झाला आहे . त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune crime : कंत्राटदार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! 17 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

Congress MVA: ठाकरे सरकारवर संकट की काँग्रेसवरच? 25 आमदारांनी सोनियांच्या भेटीसाठी वेळ मागितली

Pravin Darekar यांच्या राजीनाम्यासाठी AAP चे नेते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्याची धरपकड

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.