Pune crime : कंत्राटदार ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात! 17 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

Pune crime : कंत्राटदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात! 17 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
लाच (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: Tv9

पाणी कनेक्शन (Water connection) मिळवण्यासाठी लाच घेणाऱ्या एका कंत्राटदाराला (Contractor) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केली आहे. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मिळवण्यासाठी या कंत्राटदाराने 17,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

प्रदीप गरड

|

Mar 30, 2022 | 4:52 PM

पुणे : पाणी कनेक्शन (Water connection) मिळवण्यासाठी लाच घेणाऱ्या एका कंत्राटदाराला (Contractor) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केली आहे. महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाच्या चतुश्रृंगी विभागात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मिळवण्यासाठी या कंत्राटदाराने 17,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. महेश शिंदे (54) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याला अटक करण्याक आली आहे. कनेक्शन देण्यासाठी शिंदे यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आहेत, तसेच प्लंबरला 2 हजार रुपये द्यावे लागतील, असे ठेकेदाराने तक्रारदाराला सांगितले. त्याच्या या मागणीनंतर लाचलुचपतने सापळा रचला.

कर्वे रोडवरील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात सापळा

कंत्राटदाराने लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चतुश्रृंगी विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर ब्युरोने सोमवारी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. दुसऱ्या दिवशी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी कर्वे रोडवरील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात सापळा रचला.

घेतली 17,000 रुपयांची लाच

तक्रारदाराकडून या ठेकेदाराने यावेळी 17,000 रुपयांची लाच घेतली. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून या ठेकेदाराला अटक केली. महामंडळाचे अधिकारी आणि प्लंबर यांनीही लाच मागितल्याच्या दाव्याची आता ब्युरो चौकशी करत आहे.

आणखी वाचा :

MSEDCL workers celebration : संप मिटला, मागण्या मान्य झाल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी फोडले फटाके

Book contro : ‘कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ पुस्तक वादात, लेखकाला जीवे मारण्याची धमकी

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा फुटून तरुणाचा मृत्यू, ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतरची दुर्दैवी घटना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें