AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा फुटून तरुणाचा मृत्यू, ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतरची दुर्दैवी घटना

Man died after waching the kashmir files : 'द काश्मीर फाइल्स'च्या हृदयद्रावक कथेचा पुण्यातील एका युवकावर झाला आहे. हा परिणाम इतका धक्कादायक होता, की त्याला ब्रेन स्ट्रोक (Brain stroke) आला आणि नंतर मृत (Dead) घोषित करण्यात आले.

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा फुटून तरुणाचा मृत्यू, 'द काश्मीर फाइल्स' पाहिल्यानंतरची दुर्दैवी घटना
द काश्मीर फाइल्सImage Credit source: Tv9
| Updated on: Mar 30, 2022 | 12:17 PM
Share

Man died after waching The kashmir files :द काश्मीर फाइल्स‘ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर (Box office) चांगला चालत आहे. काश्मिरी पंडितांच्या विषयावरील कथेने काही गटांकडून याला प्रशंसा मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी रन केल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर म्हणून घोषित करण्यात आला आहे. काश्मीर हिंदूंच्या नरसंहार आणि निर्गमन यावर आधारित, विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ने भारतात आणि आजूबाजूला प्रचंड वादाला तोंड फोडले आहे. अनेक ठिकाणी हा सिनेमा आवडीने पाहिला जात आहे, तर चुकीच्या कथानकाचा आरोप करून या सिनेमाला प्रचंड विरोधही होत आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’च्या हृदयद्रावक कथेचा पुण्यातील एका युवकावर झाला आहे. हा परिणाम इतका धक्कादायक होता, की त्याला ब्रेन स्ट्रोक (Brain stroke) आला आणि नंतर मृत (Dead) घोषित करण्यात आले.

हिंदुत्ववादी संघटनेचा प्रभाव

वृत्तानुसार, पुण्यातील 38 वर्षीय अभिजित शशिकांत शिंदे 21 मार्च रोजी काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत गेला होता. हिंदुत्ववादी संघटनेचा प्रभाव असलेल्या अभिजितने द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर आपल्या मित्रांसोबत तासभर चर्चा केली. त्यानंतर तो घरच्यांशी न बोलता झोपला. त्यानंतर सकाळी अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला. त्याचे वडील त्यांच्या खोलीत गेले असता त्यांनी अभिजितला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला आयसीयूमध्येही दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी अभिजितला चिंचवडमध्ये मृत घोषित करण्यात आले.

खूप संवेदनशील होता अभिजित

रिपोर्ट्सनुसार, मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने अभिजित बेशुद्ध झाला. अभिजित खूप संवेदनशील होता, परिणामी त्याला उच्च रक्तदाब होता. दुर्दैवाने याचा परिणाम त्याच्या मृत्यूमध्ये झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘शरीरात रक्तदाब वाढल्यामुळे ब्रेक स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. झोपेतही रक्तदाब कमी-अधिक होत असतो. दरम्यान, आदल्या रात्री हा सिनेमा पाहिल्याने त्याच्या रक्तदाबावर परिणाम झाला का, हे अद्याप स्पष्ट नाही.

आणखी वाचा :

Video : शंभर फूट खोल विहिरीत दोन दिवसांपासून अडकला होता कुत्रा, बचावपथकानं काढलं सुखरूप बाहेर

कैदीही होणार आत्मनिर्भर!  शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मिळणार 50 हजारापर्यंत कर्ज ; येरवडा कारागृहापासून होणार उपक्रमाला सुरवात

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.