Video : अतिक्रमण हटवण्यास आलेल्या अधिकाऱ्यावरच आक्रमण, स्थानिकांनी पळवून पळवून चोपले; पुण्यातील धक्कादायक घटना

अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असताना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील धानोरी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होती, यावेळी हा प्रकार घडलाय.

Video : अतिक्रमण हटवण्यास आलेल्या अधिकाऱ्यावरच आक्रमण, स्थानिकांनी पळवून पळवून चोपले; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बेदम मारहाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 4:31 PM

पुणे : अतिक्रमणाविरोधात (encroachment) कारवाई करत असताना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Pmc Officer) बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील धानोरी परिसरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होती, यावेळी हा प्रकार घडलाय. या कारवाईवेळी स्थानिक नागरिक चांगलेच भडकले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण (Viral Video) केली. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे. मात्र या धक्कादायक प्रकाराने पालिका प्रशासन हादरून गेले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. अतिक्रमण हटवताना असे प्रकार घडत असल्याने अतिक्रमण हटवणे पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान बनलं आहे. गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अधिकाऱ्यांध्ये दहशतीचे वातावरण

पुण्यातल्या अनेक भागाला सध्या अतिक्रमणाने विळखा घातला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या वातूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका तातडीचे पाऊलं उचलत आहे. मात्र अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या मोठ्या राषाचा सामना करावा लागत आहे. हे घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या घटनेने आता अतिक्रमण हटवण्यास जायला अधिकारीही घाबरत आहेत. हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हे प्रकरण आता पोलिसात पोहोचले आहे. यात पोलीस कठोर पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. या मारहाणी प्रकरणी काही जणांना अटक होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांच्या अडचणी आता वाढू शकतात.

पोलिकेविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक

शहरांमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जागा अपुरी असल्याने बेकायदेशी अतिक्रमणही त्याच वेगाने वाढत आहे. मात्र त्यामुळे वेगळ्या समस्या तयार होत आहे. शहरांमध्ये अस्वच्छता, वाहतूक कोंडी आणि इतर अडचणींचा सामना अनेकांना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन पालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करत आहे. अनेक ठिकाणी पोलिकेने बुलडोझर फिरवायला सुरू केले आहे. यात स्थानिकांचा निवारा, दुकानं अनेक गोष्टी हिरावल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिकही चांगलेच आक्रमक होत आहे. त्यातूनच असे प्रकार घडत आहेत.

Video | नाशिकमध्ये पेट्रोल पंपाबाहेरच Burning car चा थरार; आगीत वाहन भस्मसात…!

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चार महिन्यांपासून बेपत्ता मुलीची सुटका, पळवून नेणाऱ्या आरोपीला बेड्या

बायकोला Video Call करुन जवानाची आत्महत्या, बायकोनेही स्वतःला पेटवलं, मोठ्या भावाला हार्ट अटॅक

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.