Congress MVA: ठाकरे सरकारवर संकट की काँग्रेसवरच? 25 आमदारांनी सोनियांच्या भेटीसाठी वेळ मागितली

Congress MVA: ठाकरे सरकारवर संकट की काँग्रेसवरच? 25 आमदारांनी सोनियांच्या भेटीसाठी वेळ मागितली
काँग्रेसच्या आमदारांचं सोनिया गांधी यांना भेटीसाठी पत्र
Image Credit source: tv9

आता काँग्रेसच्या जवळपास 25 आमदारांनी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहीत भेटीसाठी वेळ मागितला आहे. हे आमदार सरकरमधील काँग्रेसच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

दादासाहेब कारंडे

|

Mar 30, 2022 | 4:55 PM

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील काँग्रेस आमदरांची (Congress Mla) अंतर्गत धुसफूस पुन्हा बाहेर आली आहे. कारण आता काँग्रेसच्या जवळपास 25 आमदारांनी थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहीत भेटीसाठी वेळ मागितला आहे. हे आमदार सरकरमधील काँग्रेसच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार संकटात आहे की राज्यात काँग्रेसच संकटात आहे? असा सवालही राजकारणात उपस्थित केला जाऊ लागला आहे. दुसरीकडे नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेसचे मंत्री यांच्यातच चांगला समन्वय नसल्याची तक्रार काही आमदरांची असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे आता सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

काँग्रेस आमदारांच्या या पत्राबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, हा नाराजीचा भाग नाही. काँग्रेस आमदार केलेल्या कामबाबत सोनिया गांधी यांना माहिती देतील, असे सावध उत्तर नाना पटोले यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल सहाजिकच राज्याच्या राजकारणात उपस्थित होत आहे. आधीही अनेकवेळा निधी आणि महामंडळाच्या वाटपावरून काँग्रेसची खदखद बाहेर आली आहे.

नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया

किमान समान कार्यक्रमावरच खरंतर महाविकास आघाडी सरकार चालत आहे आणि पुढेही चालत राहील याची अनेक उदाहरणं देता येतील. गरिबांकडे, महिलांकडे, दलित, आदिवासी ,ओबीसी यांना कोरोना काळात याच सरकारने चांगली मदत केली आहे, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी दिली आहे. एकिकडे भाजपकडून रोज सरकार पडण्याच्या नव्या तारखा देण्यात येत आहेत. तर हेच सरकार पाच वर्षे टीकणार असा दावा सतत महाविकास आघाडीचे नेते करत आहे. मात्र अशात काँग्रेसची ही खदखद पुन्हा बाहेर आल्याने नेमकं संकट कुणावर आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

Chandrakant Khaire: 32 वर्ष वाट पहाण्यात गेले, हिशेब करतो आहे मुंबईत घर का नाही झाले ? खैरंची खंत

AAP In Mumbai: गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ‘आप’नं मुंबई दणाणून सोडली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें