त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक
झोपडपट्ट्यांचा मुद्दा मनोज कोटक यांनी संसदेत उचलला
Image Credit source: Loksabha

रेल्वे मार्गालगत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन (Slums) करण्याची मागणी खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी लोकसभेत केली आहे. या झोपडपट्ट्यांना रेल्वेकडून नोटीसा मिळाल्या आहेत.

गिरीश गायकवाड

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 30, 2022 | 4:17 PM

मुंबई : मुंबईत अनेक झोपडपट्ट्या या रेल्वेमार्गालगत (Railway Line) आहेत. रेल्वे मार्गालगत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन (Slums) करण्याची मागणी खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांनी लोकसभेत केली आहे. या झोपडपट्ट्यांना रेल्वेकडून नोटीसा मिळाल्या आहेत. रेल्वेकडून नोटीस मिळाल्याने मध्य रेल्वेच्या लगत वसलेल्या घाटकोपर ठाणे, विक्रोळी आदी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, अशी माहिती मनोज कोटक यांनी संसदेत दिली आहे. आज संसदेच्या शून्य काळात खासदार मनोज कोटक यांनी त्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली. कोटक यांनी लोकसभेत सांगितले की, 30-35 वर्षांपासून रेल्वे रुळाजवळ राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी त्वरीत एक मंडळ स्थापन करावे, जेणेकरून इथे राहणारी लोक बेघर होऊ नयेत.

कोटक यांनी संसदेत मुद्दा उचलला

कोटक संसदेत काय म्हणाले?

गेल्या काही दिवसात 30 ते 35 वर्षांपासून स्थायिक झालेल्या लोकांना नोटीस देण्याचे काम रेल्वेच्या माध्यमातून केले जात आहे.झोपडपट्टी विकास मंडळाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने या सर्व जमिनींच्या पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी , रेल्वे, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण यांना विचारणा केली. त्यात म्हंटले आहे की, पुनर्वसन आराखडा आधी जाहीर करा, रेल्वेने नोटीस दिली पण पुनर्वसन योजनेसाठी कोणतीही तरतूद केली नाही. सरकारला विनंती आहे की मध्य रेल्वेला लागून असलेल्या घाटकोपर, ठाणे, विक्रोळी येथे स्थायिक झालेल्या लोकांच्या पुनर्वसन योजनेसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण, SRA, BMC, MMRDA यांचा समावेश असलेले मंडळ स्थापन करावे आणि त्यांच्या पुनर्वसनाचे आधी नियोजन करावे, असे मनोज कोटक संसदेत म्हणाले आहेत.

झोपडपट्टीवासींना बेघर होऊ देऊ नका

तसेच त्यांना मिळालेल्या नोटिसांमुळे आज लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, शासनाने यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन राज्य शासनाच्या स्थानिक प्राधिकरणासह त्यांच्या पुनर्वसनासाठी योजना आखली पहिजे, असेही मत त्यांनी मांडलं आहे. मुंबईत पाय ठेवायला जागा मिळणं दिवसेंदिवस मुस्कील होत चालले आहे. या ठिकाणी काम धंद्यासाठी येणारी लोकं मिळेल त्या जाागेत अॅडजस्ट होतात. जिथं जागा मिळेल तिथ निवारा शोधतात. काहीही काहीच पर्याय न उरल्याने रेल्वेपटरीच्या कडेला रिकाम्या जागेत झापड्या उभारतात. अशाच काही झापड्या वर्षानुवर्षे आहेत.

AAP In Mumbai: गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ‘आप’नं मुंबई दणाणून सोडली

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी? Chandrasekhar Bavankule यांनी सांगितलं कारण

attacked on kejriwal house: अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें