AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका, चीन, पाकिस्तानच्या दबावामुळे अमेरिकेचा मोठा निर्णय? घेतला सर्वात मोठा यूटर्न

भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील झाली आहे, ही ट्रेड डील दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे. ट्रेड डीलनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी केल्याची घोषणा देखील केली होती, आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका, चीन, पाकिस्तानच्या दबावामुळे अमेरिकेचा मोठा निर्णय? घेतला सर्वात मोठा यूटर्न
अमेरिकेचा मोठा निर्णय Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 3:09 PM
Share

अमेरिका आणि भारतामध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे. ही ट्रेड डील अनेक अर्थांनी दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे. अमेरिकेसोबत ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. या ट्रेड डीलपूर्वी भारतावर 50 टक्के टॅरिफ होता, तो आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, अमेरिकेकडून आशिया खंडात ज्या -ज्या देशांवर टॅरिफ लावण्यात आला आहे, त्या सर्व देशांपेक्षा हा टॅरिफ कमी आहे, दरम्यान भारतानं रशिया आणि इराणकडून तेलाची खरेदी करू नये, त्याऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी वाढवावी, अशी एक अट देखील ट्रम्प यांनी ठेवली आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

अमेरिकन व्यापारी प्रतिनिधी कार्यालय (USTR) ने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भारताचा एक नकाशा प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि अक्साई चीन हे अधिकृतरित्या भारताचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा नकाशा गेल्या आठवड्यात भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील घोषणेदरम्यान प्रसिद्ध करण्यात आला होता. अमेरिकेनं जारी केलेल्या भारताच्या या नकाशाची जगभरात चर्चा सुरू झाली होती.

हा नकाशा अमेरिकेकडून यापूर्वी जारी करण्यात येत असलेल्या भारताच्या नकाशापेक्षा वेगळा होता. अमेरिकेकडून जो जुना भारताचा नकाशा दाखवण्यात आला आहे, त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भाग वेगळा दाखवण्यात आला आहे. मात्र ट्रेड डीलनंतर अमेरिकेनं जो नकाशा दाखवला त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अधिकृत भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर आता अमेरिकेनं मोठा युटर्न घेतला आहे. युएसटीआरने आपल्या साईटवरून हा नकाशा हटवला आहे, अमेरिकेनं जेव्हा हा नवा नकाशा जारी केला होता, तेव्हा भारतामधून आनंद व्यक्त करण्यात आला होता, तर या नकाशावर पाकिस्तान आणि चीनकडून आक्षेप घेण्यात आला होता, दरम्यान त्यानंतर आता हा नकाशा अमेरिकेकडून हटवण्यात आला आहे, विवाद टाळण्यासाठी अमेरिकेनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...