AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता थेट पुरावे बाहेर येणार! जरांगेंच्या 500 कोटी आरोपांनंतर शिंदेंचा बडा मंत्री मैदानात, मोठं नाव समोर आणणार

मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या आरोपांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरील या आरोपांना आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, या प्रकरणात तिसरा माणूस आणि अदृश्य शक्ती कोण? पुरावे सादर करण्याबाबत सामंतांनी नेमकं काय सांगितलं?

आता थेट पुरावे बाहेर येणार! जरांगेंच्या 500 कोटी आरोपांनंतर शिंदेंचा बडा मंत्री मैदानात, मोठं नाव समोर आणणार
Manoj Jarange Patil Vs Eknath ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 5:07 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचे भाजपला सांगितले असल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. काल ते नारायणगडावरील दसरा मेळाव्यात बोलत होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यामध्ये याबद्दल सत्य काय ते सांगून टाकावं असं आव्हानही त्यांनी शिंदेंना दिलं होतं. शिंदेंनी दसरा मेळाव्यात उत्तर दिलं नाही. पण मुंबईतील दसरा मेळाव्यामध्ये शिंदेंच्या शिवसैनिक नेत्यांनी जरांगेंवर जारदार हल्लाबोल केला. त्यांनी जरांगेवर टीका करत प्रहार केला. आता उदय सामंत यांनी जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे, त्याचे पुरावे शिंदेंकडे देणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आज पत्रकार परिषदेतूनही त्यांना पुन्हा एकदा उत्तर दिलं गेलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, काल मुंबईमध्येही या प्रसंगी पार्श्वभूमी सांगितली आहे. जरांगे यांच्याशी चर्चा झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न कोणाच्या तरी माध्यमातून केला जात आहे. बोलवा धनी कोणता आहे हे तपासले पाहिजे. अदृश्य शक्ती तपासली पाहिजे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध नसताना कोण तरी तिसरा माणूस त्यांच्याकडून बोलून घेत आहे. त यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे पुरावे देणार आहे, असं सामंतांनी म्हटलं आहे.

ज्यांना आरक्षण टिकवता आले नाही. त्यांच्याबद्दल चांगले बोलायचं आणि ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्याबद्दल असं बोलायचं हे बरोबर नाही. एकनाथ शिंदे यांना उभा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांचा काडीमात्र संबंध नाही. लवकर योग्य वेळी पुरावे सादर केले जातील.

श्रीकांत शिंदे हे प्रमाणिक पणे काम करत आहेत. मी अजिबात पलटवार केलेले नाही. त्यांच्या कडे पुरावे असेल तर सादर करावे. एकनाथ शिंदे यांना खुलासा देण्याची गरज नाही त्यांना महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या वतीने मी उत्तर देतोय. एखाद्या गोळी घेऊन झोप येत नसेल ते साहेबांवर कायमच बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बद्दल कोण तरी काही तर वेगळे सांगत आहेत. एखाद्याने माननीय एकनाथ शिंदे यांच्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलीन होत असेल या गोड गैरसमज मध्ये राहु नये. आपला पक्ष वाढला पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही आंदोलनात हे घुसतात. गद्दार हा बोथड झालेला शब्द आहे. १० आमदारांचे म्हणतात पंतप्रधान व्हायचे. आम्ही वास्तव सांगतो की आमच्या नेत्याला सर्वोच्च पद मिळालं पाहिजे. एकनाथ शिंदे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. १३ खासदार आमचे आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?