AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप; भाजपचा ‘तो’ नगरसेवक नॉट रिचेबल

सध्या त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे. धनराज घोगरे कालपासून घरीच आले नाहीत. | pooja chavan laptop

पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप; भाजपचा 'तो' नगरसेवक नॉट रिचेबल
वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogare) यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. सध्या त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे.
| Updated on: Mar 04, 2021 | 10:22 AM
Share

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan Suicide) आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आता भाजप (BJP) नगरसेवकाचे नाव पुढे आले आहे. या नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हा नगरसेवक गायब झाला आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. (BJP corporator Dhanraj Ghogare not reachable after accussations of stealing pooja chavan laptop)

वानवडीचे नगरसेवक धनराज घोगरे (Dhanraj Ghogare) यांनी लॅपटॉप चोरल्याचा दावा आहे. सध्या त्यांचा फोन स्वीच ऑफ आहे. धनराज घोगरे कालपासून घरीच आले नाहीत. याविषयी त्यांच्या कुटुंबीयांना विचारले असता धनराज हे सध्या आमच्या संपर्कात नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणात कोणता नवा उलगडा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

धनराज घोगरे कोण आहेत?

धनराज घोगरे हे पुणे महापालिकेतील नगरसेवक वानवडी वॉर्डमधून भाजपच्या तिकीटावर नगरसेवक पुणे महापालिकेतील शहर विकास समितीचे उपाध्यक्ष पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाच्या बदनामी प्रकरणी दाखल गुन्ह्यात नाव

पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये काय आहे?

या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांनी पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप का ताब्यात घेतला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. या लॅपटॉपमध्ये संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता आहे. पोलीस तपास सुरु असताना दुसरीकडे दररोज पूजा चव्हाण प्रकरणातील नवे व्हीडिओ, फोटो आणि माहिती समोर येत आहे. ही माहिती नेमकी कुठून बाहेर पडत आहे, याचा तपास अद्याप पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आता संशयाची सुई धनराज घोगरे यांच्याकडे वळली आहे.

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती

VIDEO: शांताबाई खरंच पूजा चव्हाणची आजी आहे का? पूजाच्या आत्महत्येनंतर आता नात्यातील फ्रॉड?

पूजा चव्हाणचा लॅपटॉप पुण्यातील भाजप नगरसेवकाने चोरला?

(BJP corporator Dhanraj Ghogare not reachable after accussations of stealing pooja chavan laptop)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.