AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 60 वर्षात सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हाच एकमेव अजेंडा: भाजपने काँग्रेसचा इतिहास दाखवून दिला…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये राहुल गांधींनी आदेश काढला आणि सावरकरांचे पुस्तकं काढून टाकली आहेत.

गेल्या 60 वर्षात सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हाच एकमेव अजेंडा: भाजपने काँग्रेसचा इतिहास दाखवून दिला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 17, 2023 | 5:00 PM
Share

पुणे : देशाच्या राजकारणात भाजप वेगवेगळ्या पातळीवर सक्रियपणे काम करत आहे. शहर ते गाव पातळीपर्यंत भाजपच्या नेत्यांकडून संवाद साधून पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपची संवाद बैठका सुरु आहेत. या अशा विविध कार्यक्रमामुळेच भाजप आता राजकारणात वेगवेगळे प्रयोग करतानाही दिसून येत आहे. त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद बैठकीत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना त्यांनी गेल्या 60 वर्षातील हिशोब मांडत काँग्रेस पक्षाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा करताना दिसले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना भाजपचा इतिहास सांगत असताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचा आणि राज्याचा विकास न करता त्यांनी फक्त घोटाळा करुन नेत्यांनी स्वतः मोठं व्हायचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले.

सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता

गेल्या 60 वर्षात काँग्रेस नेत्यांनी मतं घेतली मात्र त्याचा उपयोग काय झाला? असा सवालही त्यांनी काँग्रेसला केला आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हाच एकमेव अजेंडा काँग्रेसने देशात राबवला होता असा घणाघातही त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

काँग्रेस हद्दपार, भाजप सत्तेत

त्याच बरोबर काँग्रेसने सत्ता उपभोगलीच मात्र त्याचवेळी समाजात तेढ निर्माण करुन सत्ता उपभोगण्याचे पापही काँग्रेसनेच केले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आणि हाच त्यांचा अजेंडा होता, व तोच त्यांचा जाहीरनामाही होता अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता राज्यात काँग्रेसला हद्दपार करुन भाजप सत्तेत आणण्यास देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अभ्यासक्रमातून सावरकर गायब

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये राहुल गांधींनी आदेश काढला आणि सावरकरांचे पुस्तकं काढून टाकली आहेत. काँग्रेसला दिलेले एक मत किती चूक आहे, धर्मांतर बंदी कायदा कर्नाटकमध्ये रद्द करण्यात आला आहे. त्याच बरोबर कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदाही आता रद्द करणार आहेत असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार