AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv 9 चा Special Report : चंद्रकांत दादांच्या डोळ्यावर शाईफेक, का घ्यावी लागली एवढी मोठी काळजी

विकास लोलेंसह आणखी काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार का, यावरची पोस्ट केली होती.

Tv 9 चा Special Report : चंद्रकांत दादांच्या डोळ्यावर शाईफेक, का घ्यावी लागली एवढी मोठी काळजी
चंद्रकांत पाटील
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 17, 2022 | 10:20 PM
Share

पुणे : पिंपरी चिंचवड येथे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा दौरा होता. पुन्हा शाईफेकण्याची धमकी सोशल मीडियातून देण्यात आली होती. शाईफेकीच्या धमकीमुळं चंद्रकांत पाटील खबरदारी (precaution) म्हणून फेसशिल्ड वापरू लागलेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक झाली होती. त्यानंतर एका दौऱ्यात चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये होते. मात्र, शाईफेकीच्या धमकीमुळं चंद्रकांत पाटील फेसशिल्ड लावून पोहचले. विकास लोलेंसह आणखी काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार का, यावरची पोस्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. विकास लोले हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती आहे.

याआधी परभणीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर शाईफेक होऊ शकते, या भीतीनं पोलिसांनी पत्रकारांचीही तपासणी केली होती. कुणाच्या खिशात शाईचं पेन नाही ना, याच्या पडताळणीनंतरच पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी सोडण्यात आलं होतं.

याआधीच्या घटनेत चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यात शाई गेली होती. काही काळापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी डोळ्याचा कँसर झाला होता. त्यामुळं डोळा गोधळीसारखा शिवलेला आहे. शाईफेकीनंतर डोळ्यांच्या पापन्यांवर शाई चिपकली होती. डॉक्टरांनी ती क्लीन करून दिली. नशीब डोळ्याला काही झालं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

राज्यात सरकार शिंदे-फडणवीस यांचं आहे. चंद्रकांत दादा हे भाजपचे नेते आहेत. शिवाय राज्याचे मंत्री आहेत. तरीही यापूर्वीचा अनुभव बघता त्यांनी विशेष काळजी घेतली. कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाताना त्यांनी फेसशिल्ड वापरली होती. यानंतरतरी डोळ्याला इजा होऊ नये, यासाठी ते काळजी घेत आहेत.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?