AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दे दे प्यार दे…पुण्यात प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ, मग काय झाले वाचा

प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने तिच्या घरासमोर जात प्रेमवेड्याने गोंधळ घातला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी तरुणाला बोलवले.

दे दे प्यार दे...पुण्यात प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ, मग काय झाले वाचा
प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराने प्रेयसीला संपवले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 31, 2023 | 5:45 PM
Share

पुणे : प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराला राग आला. मग त्याने प्रेयसीच्या घरासमोर गोंधळ घातला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच त्याला नोटीस बजावून समज दिली. पुण्यात एका प्रेम वेड्याने खडकी भागात हा प्रकार केला. प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने तिच्या घरासमोर जात प्रेमवेड्याने गोंधळ घातला.

प्रियकराने प्रेयसीला फोन करून सोसायटीच्या आवारात येण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी येत त्याच्यावर कारवाई केली.

काय आहे प्रकार

प्रियकर हा ४१ वर्षांचा तर प्रेयसी ही २९ वर्षांची आहे. दोघांमध्ये दीड वर्षांपासून प्रेमसंबंध. मात्र, काही दिवसांपासून प्रेयसी प्रियकरावर रुसली. त्यांचा संवाद थांबवला. मग प्रियकराला राग आला. त्याने फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बोलण्यास नकार दिला. प्रियकराचा रागाचा पारा वाढला. त्याने थेट तिचे घर गाठले. तिला वारंवार फोन करून खाली येण्यास सांगितले. प्रेयसीने खाली येण्यास नकार दिला. प्रियकराने तिच्या सोसायटीच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

स्थानिक नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हता. अखेर प्रेयसीने कंटाळून थेट खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खडकी पोलिसांनी तरुणाला बोलावून घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान