AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : खुद्द पोलीस महासंचालक मैदानात, हेमंत नगराळे पूजा चव्हाण केसची माहिती घेण्यासाठी पुण्यात

खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. | Hemant Nagrale Visit Pune

मोठी बातमी : खुद्द पोलीस महासंचालक मैदानात, हेमंत नगराळे पूजा चव्हाण केसची माहिती घेण्यासाठी पुण्यात
पोलिस महासंचालक हेमंत नगराळे
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 16, 2021 | 12:33 PM
Share

पुणे :   खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. याअगोदर हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. (DGP Hemant Nagrale Visit Pune Over Pooja Chavan Suicide Case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता हेमंत नगराळे पुण्यातल्या घटनास्थळी जाऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास पुणे पोलिस करत आहेत. त्यांच्याकडून नगराळे या प्रकरणाची डिटेल माहिती घेतील.

पुणे पोलिसांकडून पोलिस महासंचालकांना प्राथमिक रिपोर्ट सादर

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता. त्यानंतर ते आता पुण्यात आल्याने त्यांचा हा पुणे दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय.

पुणे पोलिसांचं पथक यवतमाळला

पुणे पोलिसांचं पथक देखील यवतमाळला गेलं आहे. तिथे जाऊन ते या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायेत का? याची झाडाझडती घेत आहे. शासकिय पातळीवरुन देखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी वारंवार विचारणा होत असल्याने पुणे पोलिस वेगाने सूत्रं फिरवत आहेत.

संजय राठोड यांचा राजीनामा, सुत्रांची माहिती

जा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारणार का? आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का?, पाहावे लागणार आहे

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे यांची याच वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली. सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्याने, त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली.

(DGP Hemant Nagrale Visit Pune Over Pooja Chavan Suicide Case)

हे ही वाचा :

मोठी बातमी: अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...