AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजनचा सिलेंडर, बोटाला ऑक्सीमीटर, गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या रणधुमाळीत

कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे थेट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता किती प्रतिष्ठेची बनलीय हे स्पष्ट दिसतंय.

ऑक्सिजनचा सिलेंडर, बोटाला ऑक्सीमीटर, गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या रणधुमाळीत
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 16, 2023 | 7:37 PM
Share

मुंबई : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवडची (Chinchwad) पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष म्हणजे कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे थेट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. गिरीश बापट हे आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण असं असताना देखील पक्षासाठी ते आज व्हिलचेअरवर बसून कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराला सुरुवात केली आहे.

गिरीश बापट आजारी असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला आपण प्रचारात सहभागी होणार नाही, असं सांगितलं होतं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते संजय काकडे यांनी काल गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर बापट यांनी आपण प्रचारात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे त्यानंतर आज ते प्रचारात सहभागी देखील झाले.

कसब्यात नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवर एन्ट्री मारली. यावेळी गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड ढासळलेली दिसली. त्यांच्या बोटांमध्ये ऑक्सीमीटर होतं. तसेच ऑक्सिजनचा सिलेंडरदेखील होता.

देवेंद्र फडणवीस यांनी काल गिरीश बापट यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. फडणवीसांनी बापट यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं होतं. दुसरीकडे बापट यांनी आपण कसब्याच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं.

गिरीश बापट याआधी कसबा विधानसभा जागेवर आमदार होत्या. नंतर ते खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मुक्ता टिळक यांना या जागेसाठी संधी देण्यात आलं होतं. पण मुक्ता यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यामुळे ही जागा रिक्त झालीय.

पुण्यात प्रतिष्ठेची लढाई

पुण्यात कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीची लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या जागेवर काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. तर भाजपकडून हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आलीय. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी टिळक कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे कसब्यातील राजकीय घडामोडी चर्चेत आल्या होत्या.

दुसरीकडे चिंचवडच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आलीय. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिलीय. पण या जागेत मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय. कारण ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी इथे बंडखोरी केलीय. विशेष म्हणजे कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे या जागेसाठीचा ट्विस्ट जास्त वाढलाय.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा