AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग!

आज जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये आहे. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये आहे.

GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग!
sagar joshi
sagar joshi | Updated on: Dec 17, 2020 | 12:43 PM
Share

पुणे: तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आज जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सोन्याचा आददार दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये आहे. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये आहे. कोल्हापूरचा विचार केला तर आज सोन्याचा भाव 51 हजार 100 रुपये प्रति तोळा आहे. (Gold price is higher in Pune than in Jalgaon)

चांदीचा विचार केला तर मात्र पुण्यापेक्षा जळगावात चांदी खरेदी करणं स्वत: ठरेल. कारण, पुण्यात चांदीची किंमत प्रति किलो 65 हजार रुपये इतकी आहे. तर जळगावात चांदीला 67 हजार 506 रुपये प्रति किलो इतका दर आहे. तिकडे कोल्हापुरात चांदी 64 हजार रुपये प्रति किलो आजचा दर आहे.

मुंबईतील सोन्याचा दर

मुंबईतील सोने आणि चांदीच्या दराचा विचार केला तर मुंबई आज सोने प्रति तोळा 49 हजार 320 रुपये आहे. काल हेच सोनं 10 रुपयांनी स्वस्त होतं. गेल्या 10 दिवसातील मुंबईतील सोन्याचा दराचा विचार केला तर मुंबईत सोन्याच्या किमतीत चढउतार राहिला असला तरी फारसा फरक पडलेला दिसत नाही.

दिल्लीतील सोन्याची किंमत

दिल्लीचा विचार केला तर दिल्लीत सोनं महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं महाग आहे. दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 52 हजार 760 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 360 रुपये प्रति तोळा आहे. गेल्या 10 दिवसांचा विचार केला तर दिल्लीत सोन्याचे दर 400 रुपयांनी कमी झाले आहेत.

ऑगस्टपासून सोनेदरात घसरण

भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून प्रचंड घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता हीच किंमत  50 हजारांच्या आसपास राहिली आहे. कोरोना लस आल्याच्या बातमीनंतर गुंतवणुकदारांना सोन्यापेक्षा शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी जास्त सुरक्षित असल्याचं वाटत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर घसरला आहे. त्याचा परिणाम देशातील सराफ बाजारातही बघायला मिळत आहे

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी, सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!

Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…

Gold price is higher in Pune than in Jalgaon

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...