AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल हरवला, चोरीला गेला, चिंता करु नका, फक्त अशी पावले उचला

आता तुम्ही चोरीला गेलेला मोबाईल फोन अगदी सोप्या पद्धतीने परत मिळवू शकता. यासाठी जास्त खूप काही धावपळ करण्याची गरज नाही. फक्त पोलिसांत तक्रार नोंदवून आणि त्यानंतर CEIR पोर्टलवर जाऊन माहिती अपडेट करावी लागणार आहे.

मोबाईल हरवला, चोरीला गेला, चिंता करु नका, फक्त अशी पावले उचला
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 12, 2023 | 4:17 PM
Share

पुणे : अनेकवेळा तुमचा मोबाईल हरवला जातो किंवा चोरीला जातो. परंतु तो परत कसा मिळवायचा याची माहिती तुम्हाला नसते. आता सायबर सेलने तुमचा मोबाईल परत मिळवण्याचे काम सोपे केले आहे. यामुळे मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर काही पावले उचलून तुम्हाला तो परत मिळवता येणार आहे. सायबर सेलने हजारो जणांना या पद्धतीने मोबाईल परत मिळवून दिले आहेत. तुम्ही चोरीला गेलेला फोन अगदी सोप्या पद्धतीने परत मिळवू शकता. यासाठी जास्त खूप काही धावपळ करण्याची गरज नाही. फक्त पोलिसांत तक्रार नोंदवून ऑनलाईन पोर्टलवर ते अपडेट करावे लागणार. मोबाईल हरवल्यास नेमके काय करावे जाणून घेऊ या.

फक्त असे करा

  • आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा. तुम्ही ऑनलाइन देखील फोन चोरी झाल्याची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर एफआयआर कॉपी घेण्यास विसरु नका.
  • हरवलेल्या मोबाईलचे सीमकार्ड ब्लॉक करा. परत त्याच क्रमांकाचे नवीन सीमकार्ड घ्या. त्यामुळे तो क्रमांक CEIR वर नोंदवता येईल.
  • यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला https://ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटवर जावे लागेल. या वेबसाइटवर साइन करा. यानंतर तुम्हाला तीन पर्यायांपैकी एक Block Stolen / Lost Mobile/unblock found mobile/ check request status असे पर्याय दिसेल. त्यावरील Block Stolen / Lost Mobile  क्लिक करा.
  • खालील कागदपत्रे जोडावी (साईज ५०० केबीपेक्षा कमी)
  • पोलीसात केलेल्या तक्रारीची प्रत
  • मोबाईल बिल
  • शासकीय ओळखपत्र
  • CEIR वर तक्रार नोंदवल्यावर तुम्हाला तक्रार क्रमांक मिळेल
  • हरविलेला मोबाईल अ‍ॅक्टीव्ह झाल्यावर त्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एसएमएसने मिळेल. ती माहिती तुम्ही पोलिसांना द्यावी. त्यानंतरचे काम पोलीस करतील.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट