IAS पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात? PMO ने मागवला अहवाल

IAS Pooja Khedkar Controversy: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या वादात सापडल्या आहेत. त्यांच्यावर आता अनेक गंभीर आरोप होऊ लागले आहेत. ही गोष्ट आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचली असून पीएमओने त्यांच्याबाबतचा अहवाल मागवला आहे.

IAS पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात? PMO ने मागवला अहवाल
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 7:20 PM

आयएएस पूजा खेडकर या वादात सापडल्या आहेत. हा वाद इतका वाढलाय की आता महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे. पूजा अजूनही प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे. त्यामुळे आधीच त्यांच्या गोष्टी वादात सापडल्या आहेत. पूजा खेडकर या एक नव्हे तर अनेक प्रकरणांमध्ये वादात सापडल्या आहेत. गुरुवारी पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले आहेत. प्रशिक्षणार्थी IAS पूजाची नोकरी जाणार की काय अशी देखील चर्चा आहे.

पूजा खेडकर वादात?

पूजा खेडकर या महाराष्ट्रातील असून २०२२ च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. पूजा यांनी देशात ८४१ वा क्रमांक मिळवला होता. आता पूजा खेडकरचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचा दावा आणि वागणूक यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील पोस्टिंगदरम्यान त्यांची बरीच चर्चा होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पूजा खेडकर यांच्या गैरव्यवहाराबाबत अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला आहे.

पूजा खेडकर यांची बदली झाली आहे, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची बदली होणे फार कमी पाहायला मिळते. पूजा यांची बदली झाल्यानंतर आता त्यांच्याबद्दल अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. पूजा यांनी त्यांच्या खाजगी वाहनावर लाल-निळा दिवा लावल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची खोली ताब्यात घेण्यावरून त्या वादात सापडल्या आहेत. त्याच्या अपंगत्वावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आधी त्यांनी स्वतःला अंशतः अपंग असल्याचे सांगितले होते. नंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे अपंग म्हणून वर्णन केले.

अंपगत्व बाबत प्रश्नचिन्ह?

पूजा यांना वैद्यकीय तपासणीसाठी अनेकवेळा बोलावण्यात आले मात्र त्या एकदाही गेल्या नाहीत असा देखील त्यांच्यावर आरोप आहे. परीक्षेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी स्वत:ला अपंग घोषित केले होते का, असा प्रश्नही लोक उपस्थित करत आहेत. एवढेच नाही तर पूजा यांन बनावट कागदपत्रे बनवून तिची जात वेगळी दाखवल्याचाही आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. UPSC उत्तीर्ण झालेल्या लोकांना LBSNAA मध्ये एक वर्ष प्रशिक्षण घ्यावे लागते. पूजा या अनेक प्रकारच्या बाबींमध्ये अडकलेल्या आहेत. त्यामुळे त्या नोकरी गमावणार का अशी चर्चा लोकांमध्ये सुरु आहे.

Non Stop LIVE Update
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.