AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजितदादा, चिकनची दुकाने दिवसभर सुरु ठेवा”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचं पत्र

चिकन दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याबाबत अजित पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे.  Ajit Pawar Ramesh Thorat

अजितदादा, चिकनची दुकाने दिवसभर सुरु ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचं पत्र
अजित पवार रमेश थोरात
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 01, 2021 | 6:44 PM
Share

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांनी चिकन व अंडयाची दुकाने दिवसभर सुरु ठेवावीत, अशी मागणी केलीय. दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु ठेवल्यास कोरोनाग्रस्तांना चिकन तरी  नीट खाता येईल, अशी भावना पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित नागरिकांच्या नातेवाईकांची आहे.  चिकन दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याबाबत अजित पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे.   (NCP ex MLA Ramesh Thorat demaned to Ajit Pawar gave permission to open Chicken Shop whole day)

चिकनची दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याची मागणी का?

पुणे जिल्ह्यातील  ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना त्यांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या शनिवारी रविवारी जारी केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे चिकन व अंडी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. यामुळे या दोन दिवशी कोरोना रुग्णांना चिकन आणि अंडी मिळत नाहीत. तरी याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी या दोन दिवशी सुद्धा दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. चिकन दुकानांच्या प्रश्नी पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात आणि राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशन यांनी केली आहे.

राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशनचं निवेदन

चिकन दुकानं शनिवार आणि रविवारसह दिवसभर सुरु ठेवण्याबाबत राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशननं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलं आहे. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या विषयी निवेदन देऊन सकारात्मक चर्चा केली आहे.

जे रुग्ण बाधित झाले आहेत त्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यावर भर दिला जात असून रुग्ण लवकर बरा व्हावा म्हणून अंडी आणि चिकन खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. परंतु या दोन दिवशी दुकाने बंद असल्याने त्यांची गैरसोय होताना दिसत आहे. खासकरून ग्रामीण भागात दोन तीन दिवसांचे फ्रोझन चिकन खाणे म्हणजे शिळे चिकन खाणे असा गैरसमज आहे. त्यामुळे रोज दुकानात जाऊन ताजे चिकन खाण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी चिकन दुकानांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोरोना रुग्णांचे नातेवाईक करू लागले आहेत.

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

सरकारं येत असतात, जात असतात; सूडबुद्धीने कोणी काही करू नयेः अजित पवार

(NCP ex MLA  demanded to Ajit Pawar gave permission to open Chicken Shop whole day)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...